मुरलीधरनचा कसोटी क्रिकेटमधला 800 विकेट्सचा रेकॉर्ड अश्विन तोडू शकतो, या दिग्गजाची भविष्यवाणी

ब्रॅड हॉगने अश्विनची तुलना मुरलीधरनशी केल्याने अश्विन खरंच असा पराक्रम करु शकतो का, याची चर्चा सुरु झालीय. 34 वर्षीय अश्विनच्या नावावर 78 टेस्ट मॅचेसमध्ये 409 विकेट्स आहेत. (Ashwin can break Muralitharan record of 800 wickets in Test cricket Says brad hogg)

मुरलीधरनचा कसोटी क्रिकेटमधला 800 विकेट्सचा रेकॉर्ड अश्विन तोडू शकतो, या दिग्गजाची भविष्यवाणी
आर अश्विन आणि मुथय्या मुरलीधरन
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 6:40 AM

मुंबई :  भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनचा (Muttiah Murlitharan) टेस्ट क्रिकेटमधला 800 विकेट्सचा रेकॉर्ड तोडू शकतो, अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉग (Brad Hogg) याने केली आहे. अश्विनची विकेट्स घेण्याची भूक दिवेसंदिवस वाढत चालली आहे. तो बोलिंग टाकताना अतिशय प्रगल्भ जाणवतो. तो मुरलीधरनचा 800 विकेट्सचा रेकॉर्ड तोडू शकतो, असं भाकित हॉगने वर्तवलं आहे. (R Ashwin can break Muralitharan record of 800 wickets in Test cricket Says brad hogg)

“अश्विन सध्या 34 वर्षांचा आहे. मला वाटतं तो वयाच्या 42 पर्यंत टेस्ट क्रिकेट खेळू शकतो. त्याच्या बॅटिंगमध्ये डळमळीतपणा येऊ शकतो, पण बोलिंगबाबत तो प्रत्येक दिवशी नवं काहीतरी शकतो, प्रयोग करतो. दिवसेंदिवस त्याची बोलिंग प्रगल्भ होत चाललीय. तो कमीत कमी 600 विकेट्स तर घेऊच शकतो, पण जर त्याने अधिकचे प्रयत्न केले तर मुरलीधरनचा 800 विकेट्सचा रेकॉर्ड देखील मोडू शकतो”, असं ब्रॅड हॉगने म्हटलं आहे.

अश्विनची विकेट्स घेण्याची भूक वाढतीय

रविचंद्रन अश्विनची विकेट्स घेण्याची भूक दिवसेंदिवस वाढत चाललीय. कारण त्याच्यात क्षमता आणि प्रतिभा या दोन्ही गोष्टी आहेत. इंग्लंडच्या वातावरणाशी एकरुप होण्यासाठी त्याने कौंटी क्रिकेटदेखील खेळलं आहे, ज्यामुळे अश्विन एक यशस्वी क्रिकेटपटू बनला आहे, असं ब्रॅड हॉग टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

अश्विन बुद्धीबळ खेळाडूसारखा

मैदानावरचा त्याचा वावर हा बुद्धीबळ खेळाडूसारखा असतो. त्याचं मैदानाच्या चारही कोपऱ्यात लक्ष असतं. पाठीमागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने जो पराक्रम दाखवला तो तारीफ करण्यासारखा होता. अश्विनच्याविरुद्ध रन्स करणं तेवढं सोपं नसतं. कारण तो कधी विकेट मिळवेल, याची शाश्वती नसते. त्याच्या बोलिंगमध्ये वैविध्य आहे. बॅट्समनला अश्विनविरुद्ध खेळायला आवडतं कारण त्यांना माहितीय जर आपण अश्विनविरुद्ध खेळलो तर आपलं टेस्ट क्रिकेट चांगलं होईल. जगातल्या टॉपच्या फिरकीपटूविरुद्ध खेळायला मिळेल, अशा शब्दात हॉगने अश्विनची स्तुती केली.

अश्विन मुरलीधरनच्या विक्रमाच्या जवळ?

ब्रॅड हॉगने अश्विनची तुलना मुरलीधरनशी केल्याने अश्विन खरंच असा पराक्रम करु शकतो का, याची चर्चा सुरु झालीय. 34 वर्षीय अश्विनच्या नावावर 78 टेस्ट मॅचेसमध्ये 409 विकेट्स आहेत. तर मुरलीधरनच्या 800 टेस्ट विकेट्स आहेत. अजूनही अश्विन 391 विकेट्सने मुरलीधरनच्या पाठीमागे आहेत.

(R Ashwin can break Muralitharan record of 800 wickets in Test cricket Says brad hogg)

हे ही वाचा :

इंग्लंडला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नमवण्यासाठी भारताच्या रणरागिणी सज्ज!

World Test Championship : ‘मॅन ऑफ दी टूर्नामेंट’चा दावेदार कोण? अश्विनसह या दोन खेळाडूंमध्ये चुरस

WTC फायनल मॅच ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर काय होणार ICC ची महत्त्वपूर्ण घोषणा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.