R Ashwin निवृत्तीनंतर भावूक, पत्रकार परिषदेत चौघांचे जाहीर आभार, धोनीचं नावच नाही, पाहा व्हीडिओ

R Ashwin Retirement : आर अश्विनने निवृत्तीनंतर टीम इंडियातील त्याच्या 4 सहकाऱ्याचे आभार मानले. मात्र या चौघांमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा उल्लेख नव्हता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

R Ashwin निवृत्तीनंतर भावूक, पत्रकार परिषदेत चौघांचे जाहीर आभार, धोनीचं नावच नाही, पाहा व्हीडिओ
R Ashwin Press Conference Retirement
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 2:16 PM

टीम इंडियाचा दिग्गज ऑलराउंडर आर अश्विन याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीदरम्यान तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आणि चाहत्यांना धक्का दिला. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. अश्विनने ब्रिस्बेनमध्ये झालेल्या तिसर्‍या सामन्यानंतर हा निर्णय जाहीर केला. अश्विनने सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत येत पत्रकार परिषदेतून निवृत्तीची घोषणा केली. माझा भारतीय क्रिकेट म्हणून हा शेवटचा दिवस असल्याचं अश्विनने पत्रकार परिषदेत म्हटलं. तसेच अश्विनने या दरम्यान कोचिंग स्टाफ आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. अश्विनने चौघांचं नावं घेत खास आभार मानले. मात्र या चौघांमध्ये धोनीच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे अश्विन धोनीचं नावं घेणं विसरला की त्याने तसं करणं टाळलं? असा प्रश्न आता सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.

अश्विन काय म्हणाला?

“माझा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारातील आजचा शेवटचा दिवस असणार आहे. माझ्यात अजूनही क्रिकेटर म्हणून उत्साह आहे. मी कल्ब लेव्हलवर खेळत राहिन. मी फार मजा केली आहे. माझ्या रोहित शर्मा आणि इतर सहकाऱ्यांसह अनेक आठवणी आहेत”, असं अश्विनने म्हटलं. अश्विन टीम इंडियाकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. अश्विनने त्याच्या कारकीर्दीतील 106 कसोटी सामन्यांमध्ये 537 विकेट्स घेतल्या. तर अनिल कुंबळे 619 विकेट्ससह पहिल्या स्थानी आहेत.

हे सुद्धा वाचा

सहकाऱ्यांचे आभार

“अनेकांचे आभार मानायचे आहेत. मात्र मी बीसीसीआय आणि सहकाऱ्यांचे आभार मानले नाहीत तर मी माझ्या कर्तव्यात चुकतोय, असं होईल. मी काही जणांची नाव घेऊ इच्छितो, काही प्रशिक्षकांचाही मी आभारी आहे ज्यांनी या इथवरच्या प्रवासात मार्गदर्शन केलं. सर्वात महत्त्वाचा रोहित, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या खेळाडूंचा मी आभारी आहे. या खेळाडूंनी माझ्यासाठी कॅचेस घेतल्या आणि मला विकेट मिळवून दिल्या”, असं अश्विनने म्हटलं.

आर अश्विन काय काय म्हणाला?

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेझलवूड.

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.

“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.