मुंबई | टीम इंडियाचा अनुभवी आणि दिग्गज स्पिनर आर अश्विन याने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. अश्विनने अनेकदा आपल्या फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला फिरकीत अडकवून टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. तसेच आर अश्विनने अनेकदा शतकं ठोकून बॅट्समन म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध करुन दाखवली आहे. आता टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. आर अश्विन याला या मालिकेत महारेकॉर्ड करण्याची संधी आहे.
आर अश्विन महारेकॉर्ड करण्याच्या उंबरठ्यावर आहे. आर अश्विन अशी कामगिरी केल्यास तो दुसराच भारतीय ठरणार आहे. आता हा कारनामा फक्त टीम इंडियाचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याच्या नावावर आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची मालिका 25 जानेवारीपासून सुरु होत आहे. अश्विनला हा विक्रम पूर्ण करण्यासाठी एकूण 5 सामने आहेत. मात्र अश्विनचा पहिल्याच सामन्यात हा विक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.
आर अश्विन याला कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स करण्याची संधी आहे.आर अश्विन याने आतापर्यंत 95 कसोटी सामन्यांमध्ये 490 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आर अश्विन इंग्लंड विरुद्ध 10 विकेट्स घेताच मोठा कारनामा करेल. आर अश्विन टीम इंडियाकडून 500 विकेट्स घेणारा दुसरा आणि पहिला सक्रीय फिरकीपटू ठरेल.
अश्विनला हव्यात फक्त 10 विकेट्स
R Ashwin is just ten away from 500 Test wickets 🌟https://t.co/D44FMyI3A9 #INDvENG pic.twitter.com/UQl4kYMHfT
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 13, 2024
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, ऑली पोप. रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.