NZ vs PAK | Rachin Ravindra चं पाकिस्तानविरूद्ध शतक, सचिनचा रेकॉर्ड मोडत केला वर्ल्ड रेकॉर्ड

Rachin Ravindra Break Sachin Tendulkar Record : भारतीय वंशाच्या रचिन रवींद्र याने पाकिस्तानविरूद्ध शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवणसणी घातली आहे. पठ्ठ्याने सचिनचा रेकॉर्ड मोडला आहे.

NZ vs PAK | Rachin Ravindra चं पाकिस्तानविरूद्ध शतक, सचिनचा रेकॉर्ड मोडत केला वर्ल्ड रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 6:06 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्याधील सामन्यात किंवींनी पाकिस्तानसमोर 401 धावांचा डोंगर उभारला आहे. न्यूझीलंड संघाकडून केन विल्यमसन 95 धावा आणि रचिन रविंद्र याच्या 108 धावांच्या शतकी खेळीने पाकिस्तान संघाच्या गोलंदाजांचा धूर काढला. या सामन्यात युवा खेळाडू रचिन रविंद्र याने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. हा एकच नाहीतर आणख मोठे वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत.

सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक

वर्ल्ड कपमध्ये 25 वर्षाखालील सर्वाधिक शतके करण्याच्या विक्रम सचिनच्या नावावर होता. सचिने दोन शतके केली होती मात्र न्यूझीलंड संघाच्या रचिन रविंद्र याने यंंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय भूमीत येत तीन शतके ठोकत सचिनला मागे टाकलं आहे. सचिनने वयाच्या 22 वर्षे आणि 313 दिवसाचा असताना दोन शतके केली होतीत. तर रचिन रवींद्र 23 वर्षे 351 दिवसांचा असून त्याने तीन शतके करत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

न्यूझीलंडचा पहिलाच खेळाडू

रचिन रवींद्र याने फक्त हाच नाहीतर वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडसाठी सर्वाधिक शतके करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी ग्लेन टर्नर यांनी 1975 मध्ये दोन शतके, मार्टिन गुप्टिल 2015 मध्ये दोन शतके, 2019 मध्ये केन विल्यमसन दोन शतके केली होतीत. आता रचिनने तीसरं शतक करत हासुद्धा विक्रम आपल्या नावावर केलाय.

पहिल्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक करणाऱ्या खेळाडूमध्ये तो पहिल्या नंबरवर येण्यापासून काही धावा मागे आहे. यंदाचा वर्ल्ड कप त्याचा पहिला वर्ल्ड कप असून त्याने 8 डावात 522 धावा केल्या आहेत. तर याआधी हा विक्रम इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोच्या नावावर होता. 2019 मध्ये जॉनी बेअरस्टोने 11 डावात 532 धावा केलेल्या. तर बाबर आझम याने 2019 मध्ये 474 धावा केल्या होत्या. या सर्वांना मागे पछालं असून आता बेअरस्टोला मागे टाकण्यापासून १० धावा कमी आहे.

न्यूझीलंडचे प्लेईंग इलेव्हन: डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (C), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (w), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट.

पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन: अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (w), इफ्तिखार अहमद, सौद शकील, आगा सलमान, शाहीन शाह आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.