टी20 वर्ल्डकपपूर्वी राहुल द्रविडने व्यक्त केली चिंता, अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेनंतर पोटातलं आलं ओठात
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या साडेचार महिन्यांपेक्षा कमी कालावधी आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाने आतापासूनच कंबर कसली आहे. ऑस्ट्रेलियानंतर अफगाणिस्तानला पराभूत टी20 वर्ल्डकपची नेमकी तयारी काय आहे हे दाखवून दिलं आहे. पण आता प्रशिक्षक राहुल द्रविड याने एका चिंता व्यक्त करून दाखवली आहे.
मुंबई : 1 जून 2024 पासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी साडे चार महिन्यांपेक्षा कमी कालावधी आहे. त्यासाठी टीम इंडियाने आतापासून सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानला 3-0 ने पराभूत करत आपला ताकद दाखवून दिली आहे. मालिकेतील विजयानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने आनंद व्यक्त केला आहे. पण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला वेगळीच चिंता सतावत आहे. टी20 वर्ल्डकप तोंडावर आला असताना राहुल द्रविडने एक दु:ख व्यक्त केल आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या तयारीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कारण टीम इंडियाला टी20 वर्ल्डकपपूर्वी सरावासाठी हवा तसा वेळ मिळणार नाही. कारण अफगाणिस्तान विरुद्धची मालिका शेवटची होती. त्यानंतर खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असतील. आयपीएल संपली की थेट टी20 वर्ल्डकपसाठी मैदाात उतरतील.
“दुर्दैवाने सांगावसं वाटते की, टीम म्हणून आम्हाला जास्त क्रिकेट खेळण्यास मिळणार नाही. आयपीएल होणार आहे. या स्पर्धेत काही खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवलं जाईल. यावरही लक्ष केंद्रीत आहे की संघात कोणती जागा भरणं गरजेचं आहे.”, असं प्रशिक्षक राहुल द्रविड याने सामन्यानंतर सांगितलं.
“वनडे वर्ल्डकपनंतर वेगवेगळ्या कारणामुळे आम्हाला संघात इतर खेळाडूंना द्यावं लागलं. मला असं वाटतं की काही पर्याय चांगले आहेत. ज्यांनी चांगलं प्रदर्शन केलं. त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवून दिलं आहे. काही ठिकाणी आम्हाला आणखी काम करण्याची आवश्यकता आहे. आम्ही याबाबत विचार करत आहोत.”, असंही राहुल द्रविडने पुढे सांगितलं.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं संघात पुनरागमन झालं आहे. तर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त आहेत. अशात कोणता खेळाडू खेळणार कोणता हा मोठा पेच आहे. आयपीएलमध्ये एखाद्या खेळाडूचं नशिब उघडलं तर सध्या संघातील स्थान पक्कं समजणाऱ्या खेळाडूंना धक्का बसू शकतो. त्यामुळे आता आयपीएलमध्ये खेळाडूंची अग्निपरीक्षा असणार आहे.