विशाखापट्टणम | टीम इंडियाने पहिल्या सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक करत विजय मिळवला. टीम इंडियाने अनेक खेळाडूंच्या अनुपस्थितीत हा सामना जिंकला. रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, केएल राहुल आणि विराट कोहली यांच्याशिवाय टीम इंडियाने हा सामना जिंकून दाखवला. टीम इंडियाने या विजायसह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा या दोघांना दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून माघार घेतली. तर विराटने 2 सामन्यात खेळणार नसल्याचं बीसीसीआयने सांगितलं होतं.
आता टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना हा 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. आता पहिल्या 2 सामन्यात नसलेला विराट उर्वरित 3 सामने खेळणार की नाही, असा प्रश्न सातत्याने विचारण्यात येत आहे. अखेर उत्तर मिळाल्याने या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी विराट उर्वरित मालिकेत खेळणार की नाही, याबाबत माहिती दिली आहे.
दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिली. या दरम्यान विराटच्या कमबॅकबाबतही प्रतिक्रिया दिली. “येत्या काही दिवसात निवड समिती टीम इंडियाची घोषणा केली जाईल. तसेच विराटसोबत चर्चा करुन त्याच्याबाबत अपडेट घेतली जाईल”, अशी माहिती राहुल द्रविड यांनी दिली.
विराट कोहलीबाबत मोठी अपडेट
Rahul Dravid said, “we’ll connect with Virat Kohli and find out about his availability for the rest of the series”. pic.twitter.com/BSNSR3q1tt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 5, 2024
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, श्रीकर भारत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, सरफराज खान, आवेश खान , सौरभ कुमार आणि ध्रुव जुरेल.