‘राहुल द्रविड सरांची थोडी भीती वाटते पण….’; पृथ्वी शॉ ने सांगितला खास अनुभव

"माझा अंदाज आक्रमक खेळण्याचा आहे आणि द्रविड सरांची एकूण खेळशैली पाहिली तर ती शांत आहे. पण द्रविड सरांनी कधीच मला माझा नॅचरल गेम बदलायला सांगितला नाही, असं शॉ म्हणाला. (Rahul Dravid sir never Asked me to curb my natural game Says prithvi Shaw)

'राहुल द्रविड सरांची थोडी भीती वाटते पण....'; पृथ्वी शॉ ने सांगितला खास अनुभव
राहुल द्रविड आणि पृथ्वी शॉ
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 7:17 AM

मुंबई : टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज ज्याने अल्पावधीत आपल्या खेळाने जगभरातील क्रिकेट रसिकांचं आणि भारतीय निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलंय त्या पृथ्वी शॉ ने (prithvi Shaw) आपला गुरु राहुल द्रविडची (Rahul Dravid) तोंड भरुन स्तुती केली आहे. द्रविड सरांनी कधीच मला माझा नॅचरल गेम बदलायला सांगितला नाही. मला कायम माझ्या क्षमतेनुसार आणि नैसर्गिक खेळानुसार खेळून दिलं, असं म्हणत शॉने द्रविडची तारीफ केली आहे. (Rahul Dravid sir never Asked me to curb my natural game Says prithvi Shaw)

माझा नॅचरल गेम बदलायला सरांनी कधीच सांगितलं नाही….

“माझा अंदाज आक्रमक खेळण्याचा आहे आणि द्रविड सरांची एकूण खेळशैली पाहिली तर ती शांत आहे. पण द्रविड सरांनी कधीच मला माझा नॅचरल गेम बदलायला सांगितला नाही. त्यांनी मला कायम माझ्या क्षमतेनुसार खेळण्याचा सल्ला दिला. त्यासाठी सतत मार्गदर्शन केलं”, असं पृथ्वी शॉ म्हणाला.

द्रविड सरांनी कधीच दबाव टाकला नाही

पृथ्वी शॉने क्रिकबजशी बोलत असताना राहुल द्रविडच्या एकूण कार्यशैलीवर व्यक्त झाला. तो म्हणाला, द्रविड सरांसोबत 2 वर्षांपूर्वी आम्ही दौरा केला होता. आम्हाला माहिती होतं की ते खूपच वेगळ्या स्वभावाचे आहेत. त्यांचं नेचर अगदी शांत आहे. पण त्यांनी कधीच आम्हाला त्यांच्यासारखं वागा म्हणून सांगितलं नाही. कधीच कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नाही. तसंच खेळाडूंवर प्रेशर न आणता त्यांचा नॅचरल गेम खेळण्याला प्रोत्साहन दिलं, असं शॉ म्हणाला

द्रविड सरांची थोडी भीती वाटते पण…

19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने विश्वकप जिंकला, त्या संघाचं नेतृत्व पृथ्वी शॉ ने केलं होतं तर राहुल द्रविडने प्रशिक्षकपदाची कमान सांभाळली होती. तेव्हापासून पृथ्वी शॉ आणि राहुल द्रविडचं उत्तम ट्यूनिंग आहे. परंतु शॉ आक्रमक स्वभावाचा तर राहुल द्रविड शांत स्वभावाचा… त्यामुळे स्वभावगुणांची कायम ती एक दरी असते. मात्र ती दरी दोघांच्यामध्ये आली नाही.

पृथ्वी शॉ म्हणतो, “खेळाडूंच्या खेळाविषयी आणि सुधारणेविषयी सर खूपच जागरुक असतात. त्यांना सतत मार्गदर्शन करत असतात. कधी कधी त्यांची भीती वाटते. कारण ते असले की खूप शिस्त पाळावी लागते. मैदानात जरा त्यांची भीती वाटते पण मैदानाच्या बाहेर पडलं की ते आमचे चांगले मित्र असतात”, असं शॉ म्हणाला.

त्यांच्यासोबत डिनर म्हणजे एक स्वप्न

“द्रविड सर आमच्याबरोबर डिनरला यायचे. त्यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूसमवेत डनर करण्याचं कुणाचंही स्वप्न असतं. माझं स्वप्न तर पूर्ण झालं. कोणत्याही युवा खेळाडूला 15 ते 16 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार्‍या दिग्गज क्रिकेटपटूबरोबर डिनर करायला नक्की आवडेल”, असंही शॉ म्हणाला.

(Rahul Dravid sir never Asked me to curb my natural game Says prithvi Shaw)

हे ही वाचा :

WTC Final : विजयासाठी भारतीय फलंदाजांनी आखली खास रणनीती, टीम इंडियाचं ‘मिशन-400’ नेमकं काय?

किंग खान शाहरुख क्रिकेटपटूच्या मदतीला धावला, कोरोनावरील उपचारासाठी मोलाची मदत

तर सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली तब्बल 30 शतकांनी पुढे असेल!

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.