Rahul Tripathi :..हे तर स्वप्न पूर्ण झाल्यासारखं, असं का म्हणाला राहुल त्रिपाठी? जाणून घ्या…
हुल त्रिपाठी गेल्या 6 वर्षांपासून क्रि आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) बुधवारी रात्री आयर्लंडविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा केली. इंग्लंडविरुद्ध 1 जुलैला होणाऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीत व्यस्त असल्यानं अनेक दिग्गज खेळाडू या दौऱ्यात सहभागी होणार नाहीत. या मालिकेचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडं सोपवण्यात आलंय असून अनेक युवा खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. या खेळाडूंपैकी एक राहुल त्रिपाठीचंही (Rahul Tripathi) नाव आहे. राहुलवर अनेक दिवसांपासून अनेकांच्या नजरा होत्या. अखेर राहुलला संधी मिळाली. असं म्हणतात प्रयत्न करत जावे यश कधी ना कधी मिळतंच. तसंच काहीसं राहुल त्रिपाठीचं झालंय. राहुलचा टीम इंडियात सहभाग होणं, ही त्याच्यासाठी खूप मोठी बाब आहे. अनेक दिवसांच्या प्रयत्नाचं हे फळ आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत या खेळाडूला संधी न मिळाल्यानं क्रिकेट विश्वातील लोकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. राहुल त्रिपाठी गेल्या 6 वर्षांपासून आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे.आयपीएल 2022 मध्ये त्याच्या बॅटने 158.24 च्या स्ट्राइक रेटने 413 धावा केल्या होत्या.
राहुल काय म्हणाला?
अखेरीस टीम इंडियामध्ये स्थान मिळाल्यानंतर पीटीआयशी बोलताना त्रिपाठीनं त्याची प्रतिक्रिया दिली. यावेळी तो म्हणाला की, ‘ही एक मोठी संधी आहे. एक स्वप्न पूर्ण झालं. मला याचा खूप आनंद वाटला आहे. स्थानिक स्पर्धांमध्ये एका षटकात दोनदा सहा षटकार मारणारा खेळाडू राहुल पुढे म्हणाला की, ‘मला खूप आनंद आहे की निवडकर्त्यांनी आणि सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले. मला आशा आहे की जर मी करू शकलो तर. खेळण्याची संधी, मी माझे पूर्ण प्रयत्न करणार आहे,. टीमसाठी मी अधिकाधिक देण्याचा प्रयत्न करणार,’ असं यावेळी राहुल म्हणाला.
भारताचा T20 संघ खालीलप्रमाणे आहे
हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक
158.24 च्या स्ट्राइक रेटनं 413 धावा
राहुल त्रिपाठी गेल्या 6 वर्षांपासून क्रि आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करत आहे.आयपीएल 2022 मध्ये त्याच्या बॅटनं 158.24 च्या स्ट्राइक रेटने 413 धावा केल्या होत्या. दरम्यान, आता टीम इंडियात संधी मिळाल्यानं त्याला खूप आनंद झालाय.