Video : राजस्थानचा 24 धावांनी लखनौवर विजय, पॉईंट्स टेबलमध्ये कुणाची आगेकूच? संजूनं मैदानात नेमकं काय केलं? पंच का चक्रावला? पाहा Highlights Video
हुडाने 39 चेंडूत 59 धावांची शानदार खेळी खेळली. चहलने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
मुंबई : राजस्थान रॉयल्सनं (RR) आयपीएल (IPL 2022) च्या 63 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी पहिले केली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 6 गडी गमावून 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सला 20 षटकांत 8 बाद 154 धावाच करता आल्या. लखनौसाठी डेकाकने 7, कर्णधार केएल राहुलने 10 धावा केल्या. बडोनी खाते उघडू शकले नाहीत. दीपक हुडा ५९ धावा करून बाद झाला. कृणाल पंड्या 25 धावा करू शकला. स्टॅनिशने 27 धावांची खेळी खेळली. लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज दीपक हुडा स्टंपिंगचा बळी ठरला आहे. हुडाने 39 चेंडूत 59 धावांची शानदार खेळी खेळली. चहलने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
.@rajasthanroyals return to winning ways! ? ?@IamSanjuSamson & Co. register their 8⃣th victory of the season as they beat #LSG by 24 runs. ? ?
हे सुद्धा वाचाScorecard ? https://t.co/9jNdVDnQqB#TATAIPL | #LSGvRR pic.twitter.com/9vA9lVStm5
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
पंच का चक्रावला?
दरम्यान, दीपक हुडाला यष्टीचीत करण्यासाठी राजस्थानचा कर्णधार संजूने खूप प्रयत्न केले. संजूने जे केलं ते पाहून पंचही चक्रावल्याचं दिसून आलं. अखेर त्यांना तिसऱ्या पंचाची मदत घ्यावी लागली.
Deepak Hooda’s fine knock comes to an end.@yuzi_chahal picks his first wicket of the match as captain @IamSanjuSamson completes the stumping. ? ?
Follow the match ? https://t.co/9jNdVD6NoB#TATAIPL | #LSGvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/g2dkLVBnZv
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
हुडा आणि पंड्या यांच्यात 50 हून अधिक भागीदारी
दीपक हुडा आणि कृणाल पंड्या यांनी चौथ्या विकेटसाठी 41 चेंडूत 61 धावांची भागीदारी केली.
पॉईंट्स टेबलमध्ये बदल?
रविवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 24 धावांनी पराभव केला. यानंतर पॉईंट्स टेबल बघितल्यास राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानी तर लखनौ तिसऱ्या स्थानी आहे. या दोन्ही संघाने आतापर्यंत तेरा सामना खेळले असून त्यापैकी दोन्ही संघांनी आठ-आठ सामने जिंकले आहेत. तर देन्ही संघांना पाच-पाच सामन्यात अपयश आलंय. राजस्थानला सोळा गुण आहेत तर लखनौला देखील सोळा गुण पॉईंट्स टोबलमध्ये आहे.
A look at the Points Table after Match No. 6⃣3⃣ of the #TATAIPL 2022 ? #LSGvRR pic.twitter.com/sgBckh3Crt
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
बोल्ट जखमी
डावाच्या 9व्या षटकात चौकार मारण्याच्या प्रयत्नात ट्रेंट बोल्टच्या मानेला दुखापत झाली. मात्र ही दुखापत किती गंभीर आहे हे कळू शकलेले नाही. पण स्लो मोशन कॅमेऱ्यात त्याची मान खूप वळताना दिसत आहे.