मुंबई : अवघ्या साडेसहा महिन्यांच्या अंतराने इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) नवा हंगाम सुरु होत आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा 26 मार्चपासून मुंबईत सुरू होत आहे. हा नवीन हंगाम खूप खास आहे, कारण यावेळी सर्व संघ बदलले आहेत. काही जुने आणि बहुतांशी नवीन चेहरे घेऊन सर्व संघ पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. तसेच यंदा स्पर्धेत दोन नवीन संघ सहभागी झाले आहेत. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हा संघदेखील स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. संघाने ऑफ-सीझन शिबिरही आयोजित केले होते, ज्यामध्ये कर्णधार संजू सॅमसनसह अनेक प्रमुख खेळाडू उपस्थित होते. सॅमसन व्यतिरिक्त, राजस्थानने गेल्या मोसमानंतर इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जॉस बटलर आणि युवा भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वाल या दोघांना संघात कायम ठेवले होते आणि हे तीन खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील. नव्याने खरेदी केलेल्या केळाडूंपैकी 8 जणांना राजस्थान रॉयल्सच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल.
2008 च्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ राजस्थानने गेल्या महिन्यात झालेल्या दोन दिवसीय महा लिलावात रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट सारख्या सर्वोत्तम खेळाडूंना विकत घेऊन चांगली सुरुवात केली होती, परंतु नंतर संघ मागे पडला आणि त्याचा परिणाम त्यांच्या संघावर झाला. संघाने शेवटी अनेक विदेशी खेळाडूंना मूळ किमतीत (बेस प्राईसमध्ये) खरेदी केले. यामुळे समतोल आणि मजबूत प्लेइंग इलेव्हन तयार करणे थोडे कठीण काम होते. राजस्थान रॉयल्स 29 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
हा संघ अष्टपैलू खेळाडूंच्या आघाडीवर थोडा कमजोर दिसत आहे. संघात जेम्स नीशम, रियान पराग आणि डॅरेल मिशेल हे मुख्य अष्टपैलू खेळाडू आहेत, तर रविचंद्रन अश्विन देखील या भूमिकेत आहे. मात्र, यात केवळ नीशम, पराग आणि अश्विन यांनाच प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते, कारण मिशेलने या भूमिकेत स्वत:ला फारसे सिद्ध केलेले नाही.
राजस्थानची गोलंदाजी अधिक चांगली दिसते आणि मजबूत फलंदाजी क्रमाने हा संघ खूप वजनदार ठरू शकतो. गोलंदाजीत न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि उदयोन्मुख भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांच्या रूपात दोन चांगले वेगवान गोलंदाज राजस्थानच्या ताफ्यात आहेत, तर फिरकी विभागाची जबाबदारी युझवेंद्र चहल आणि अश्विन यांच्या खांद्यावर असेल. सोबत नीशमचा मध्यमगती गोलंदाज आणि रियान परागचा पार्ट टाईम फिरकीपटू म्हणून प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.
संजू सॅमसन (कर्णधार-यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरन हेटमायर, रियान पराग, जेम्स नीशम, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा
इतर बातम्या
IPL 2022: राष्ट्रनिष्ठा की, IPL, अखेर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी दिलं उत्तर
IPL 2022: विराट कोहली, फाफ ड्युप्लेसी प्रॅक्टिससाठी येणार ठाण्यात, एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा
IPL 2022: पहिल्याच नेट सेशनमध्ये Mumbai Indians च्या टीम डेविडची दे, दणादण बॅटिंग, पहा VIDEO