IPL 2022, DC vs RR : राजस्थान रॉयल्स 15 धावांनी विजयी, बटलर, पडिक्कलची जोरदार चर्चा
राजस्थानने 20 षटकात 2 बाद 222 धावा काढून 223 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला दिले होतं. हे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला पूर्ण करता आलं नाही.
मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात बटरलनं शतक झळकावलंय. राजस्थानने (RR)20 षटकात 2 बाद 222 धावा काढून 223 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) दिले होतं. हे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला पूर्ण करता आलं नाही. पृथ्वी शॉने 27 बॉलमध्ये 37 धावा तर 5 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानंतर रोव्हमल पॉवेलने देखील 36 धावा काढल्या. त्यानंतर ऋषभ पंतने 44 धावा काढल्या. यावेळी त्याने चार चौकार मारले. ललित यादवने 37 धावा काढल्या. त्यापैकी तीन चौकार आणि दोन षटकार त्याने मारले. डेव्हिड वॉर्नरने 28 धावा काढल्या. त्यापैकी पाच चौकार आणि एक षटकार होता. असं करुन दिल्लीने लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आलं. त्यांना वीस ओवरमध्ये 207 धावाच काढता आल्या.
बटलरचे अर्धशतक, शतक
आयपीएलच्या सीजनमध्ये बटलरने पुन्हा एकदा अर्धशतक पूर्ण केलंय. तीन अर्धशतक आणि दोन शतक आयपीएलच्या या सीजनमध्ये जॉस बटलरने पूर्ण केले आहेत. तर दुसरीकडे देवदत्त पडिक्कल देखील फॉर्ममध्ये आहे. त्याने देखील षटकार आणि चौकार लगावले आहेत. देवदत्त पडिक्कलने रहमानच्या बॉलवर तिसऱ्या ओवरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर सलग 3 चौकार मारले आहेत. तर बटलरने आठव्या ओवरच्या दुसऱ्या बॉलमध्ये षटकार आणि तिसऱ्या बॉलमध्ये चौकार मारला आहे. त्यामुळे राजस्थानचा स्टार खेळाडू असं मैदानावरील उपस्थित क्रिकेट प्रेमी बटलरकडे पाहून म्हणतायेत.
बटलरची कॅच सोडली अन् षटकार मिळाला, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पडिक्कल जोरदार खेळला!
बटरल आणि पडिक्कलनंतर संजू सॅमसनने 19 बॉलमध्ये 46 धाला 5 चौकार आणि 3 षटकार मारले. तर हेटमायरने फक्त एक धावा काढली. बटलरने 65 चेंडूत 116 धावा केल्या. या सीजनमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 9 षटकार मारले. 2016 पासून तो या T20 लीगचा भाग आहे. पण. त्याच्या बॅटने एकाच सत्रात 3 शतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2021 च्या सीजनमध्येत्याने 1 शतक झळकावले होते.
देवदत्त पडिक्कलची जोरदार फलंदाजी, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
राजस्थान रॉयल्सचा पराभव
पृथ्वी शॉने 27 बॉलमध्ये 37 धावा तर 5 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानंतर रोव्हमल पॉवेलने देखील 36 धावा काढल्या. त्यानंतर ऋषभ पंतने 44 धावा काढल्या. यावेळी त्याने चार चौकार मारले. ललित यादवने 37 धावा काढल्या. त्यापैकी तीन चौकार आणि दोन षटकार त्याने मारले. डेव्हिड वॉर्नरने 28 धावा काढल्या. त्यापैकी पाच चौकार आणि एक षटकार होता. असं करुन दिल्लीने लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आलं. त्यांना वीस ओवरमध्ये 207 धावाच काढता आल्या.
इतर बातम्या
Corona : राज्यात आज 121 नव्या रुग्णांची नोंद, तर मुंबईत 68 नवीन कोरोनाबाधीत