पाकिस्तानच्या खेळाडूचं प्रभू श्री रामाच्या मूर्तीसंदर्भात ट्विट, ‘माझा रामलल्ला…’
Pakistan Cricketer on Lord Ram : पाकिस्तान संघाच्या खेळाडूने श्री रामाचा फोटो पोस्ट केला आहे. या खेळाडूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कोण आहे तो खेळाडू ज्याने प्रभू रामाचा फोटो पोस्ट केलाय, जाणून घ्या.
मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटनाआधी देशभरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यामधून रामभक्त हे अयोध्येमध्ये दाखल होत आहेत. केंद्र सरकारनेही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हाफ डे असल्याचं जाहीर केलंय. राम मंदिर होत असल्याने सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाची चर्चा ही संपूर्ण देशभरात आहे. पाकिस्तातनच्या खेळाडूनेही श्री रामाचा फोटो शेअर केला आहे. पाकिस्तानच्या या खेळाडूचं ट्विट जोरदार व्हायरल होत आहे.
कोण आहे तो खेळाडू?
पाकिस्तान आणि भारतामधील वाद संपूर्ण जगताला माहिती आहे. मात्र पाकिस्तान संघामधील माजी खेळाडू राहिलेल्या दानिश कनेरिया याने प्रभु श्री रामाचा फोटो शेअर केला आहे. पाकिस्तानचा असूनही त्याने रामाचा फोटो कसा काय पोस्ट केला? असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल. मात्र दानिश कनेरिया हा पाकिस्तानमध्ये असला तरीसुद्धा तो एक कट्टर हिंदू आहे.
माझा रामलल्ला विराजमान झाला, असं ट्विट दानिश कनेरियान याने केलं आहे. त्यासोबतच त्याने रामाचा चेहरा झाकलेला फोटो शेअर केला आहे. दानिश याने फोटो शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी आणि रामभक्तांनी तो खरा कट्टर हिंदू असल्याचं म्हटलं आहे.
मेरे रामलला विराजमान हो गए 😍 pic.twitter.com/mZX1jpLlT9
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 19, 2024
पाकिस्तान क्रिकेटमध्ये खेळत असताना त्याला हिंदू असल्यामुळे अनेकवेळा चुकीची वागणूक दिल्याचं त्याने उघडपणे सांगितलं होतं. इतकंच नाहीतर त्याला धर्मांतर करत मुस्लिम होण्यासाठी दबाव टाकल्याचंही कनेरिया म्हणाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचे ट्विट पाहिले तर त्याने राम मंदिराच्या समर्थनार्थ अनेक ट्विट केले आहेत.
दरम्यान, दानिश कनेरिया याने पाकिस्तानकडून खेळताना 61 कसोटी, 18 वन डे खेळले यामध्ये अनुक्रमे 261 विकेट तर 15 विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तान संघाच्या हुकमी स्पिनर्सपैकी कनेरिया होता. त्याने तब्बल 15 वेळा पाच विकेट घेतल्या होत्या. दोन सामन्यांमध्ये दहा विकेटही मिळवल्या होत्या.