Ranji Trophy 2024 2025 : रणजी ट्रॉफी स्पर्धेचा थरार 11 ऑक्टोबरपासून, रोहित शर्मा खेळणार, पहिल्या सामन्यात मुंबई-बडोदा भिडणार,जाणून घ्या सर्वकाही
Ranji Trophy 2024-25 Format Explainer: बीसीसीआयने यंदा रणजी ट्रॉफी स्पर्धेतील साखळी फेरीमधील सामन्याचं आयोजन हे 2 टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने हे 11 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. तर त्यानंतर दुसऱ्या टप्प्याला 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या 90 व्या हंगामाला शुक्रवार 11 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात गतविजेता मुंबई विरुद्ध बडोदा आमनेसामने आहेत. मुंबई विरुद्ध बडोदा यांच्यातील सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे कोतंबी स्टेडियम, बडोदा येथे करण्यात आलं आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात या रणजी ट्रॉफीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. यंदा ही स्पर्धा कशी पार पडणार आहे? या स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी असणार आहेत? तसेच या स्पर्धेतील आतापर्यंतच्या काही महत्त्वाच्या बाबी आपण जाणून घेणार आहोत.
रणजी ट्रॉफी स्पर्धेचं यंदा 2 टप्प्यात आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 38 संघ सहभागी होणार आहेत. या 38 संघांना एलीट आणि प्लेट अशा 2 विभागांमध्ये विभागण्यात आलं आहे. त्यानुसार एलीट गटात 32 संघ असणार आहेत. या 32 संघांची 8-8 नुसार 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. एलिट ग्रुप ए, एलिट ग्रुप बी, एलिट ग्रुप सी आणि एलीट ग्रुप डी अशी या 4 गटांची नावं आहेत. तर प्लेट गटात 6 संघ आहेत.
एलीट ग्रुपमधील कोणते संघ कोणत्या गटात?
- ग्रुप A – मुंबई, बडोदा, सर्विसेज, जम्मू-काश्मीर, त्रिपुरा, महाराष्ट्र, ओडिशा आणि मेघालय.
- ग्रुप B – विदर्भ, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, पोंडिचेरी, हिमाचल प्रदेश आणि हैदराबाद.
- ग्रुप C – मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश, पंजाब आणि बिहार.
- ग्रुप D – तमिळनाडु, सौराष्ट्र, रेल्वे, दिल्ली, झारखंड, छत्तीसगड, आसाम आणि चंडीगड.
एलिट ग्रुपबाबत महत्त्वाची माहिती
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या गेल्या हंगामात हवामानामुळे काही सामन्यांवर परिणाम झाला. त्यामुळे यंदा बीसीसीआयने सामन्यांचं आयोजन हे देशातील विविध ठिकाणी केलं आहे. पहिल्या टप्प्याला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर सर्व संघ त्यांच्या साखळी फेरीतील पाचवा सामना 13 नोव्हेंबरपासून खेळतील. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी रणजी ट्रॉफीतील सामने थांबवण्यात येतील. विजय हजारे ट्रॉफीतील सामने 20 तर सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील सामने हे 50 षटकांचे असतील.
दुसरा टप्पा
त्यानंतर 23 जानेवारीपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. इथून बाद फेरीला सुरुवात होईल. त्यानंतर 8 फेब्रुवारीपासून 4 उपांत्य पूर्व फेरीतील सामने आणि 17 फेब्रुवारीपासून 2 उपांत्य फेरीतील सामने पार पडतील. तर एलिट ग्रुपमधील अंतिम सामना हा 26 फेब्रुवारीला खेळवण्यात येईल.
प्लेट ग्रुपबाबत माहिती
प्लेट ग्रुपमध्ये गोवा, मणिपूर, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश संघाचा समावेश आहे. प्लेट गटातील संघांच्या सामन्यांनाही 11 ऑक्टोबरपासूनच सुरुवात होणार आहे. प्लेट ग्रुपमधील प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध 1-1 सामना खेळणार आहे. या गटातील अव्वल 2 संघ अंतिम फेरीत पोहचतील. प्लेट ग्रुपमधील अंतिम सामना हा 23 जानेवारीपासून खेळवण्यात येईल. प्लेट ग्रुपमधून विजेता संघ ठरवण्यासाठी स्वतंत्र स्पर्धेचं यजमानपद सांभाळेल.
कामगिरी महत्त्वाची
तसेच अंतिम फेरीत पोहचणाऱ्या दोन्ही संघांचा पुढील हंगामात एलीट ग्रुपमध्ये समावेश केला जाईल. तसेच एलीट ग्रुपमधून पॉइंट्स टेबलमधील शेवटच्या 2 संघांना प्लेट गटात टाकलं जाईल. यंदा हैदराबाद आणि मेघालय या 2 संघाना पदोन्नती मिळाल्याने ते एलिट ग्रुपमध्ये आले आहेत. तर मणिपूर आणि गोवा यांचं डिमोशन झाल्याने त्यांना प्लेट ग्रुपमध्ये वर्ग करण्यात आलं आहे.
- प्लेट ग्रुप – गोवा, मणिपूर, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश
विजयी संघाला किती गुण?
विजयी संघाला 6 गुण मिळतील. डावाने किंवा 10 विकेट्सने जिंकल्यास 1 अधिकचा गुण दिला जाईल. दोन्ही डाव टाय झाल्यास दोन्ही संघांना समसमान 3-3 गुण दिले जातील. पहिल्या डावातील आघाडींनतर सामना अनिर्णित राहिल्यास लीड घेणाऱ्या संघाला 3 गुण दिले जातील.
मुंबई यशस्वी संघ
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना हा 4 नोव्हेंबर 1934 साली (मद्रास) चेन्नई विरुद्ध (म्हैसूर) कर्नाटक यांच्यात खेळवण्यात आला होता. मुंबई रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 42 वेळा रणजी ट्रॉफी उंचावली आहे. वसीम जाफर यांच्या नावावर स्पर्धेत सर्वाधिक 12 हजार 38 धावांचा विक्रम आहे. तर राजिंदर गोयन याने सर्वात जास्त 637 विकेट्स घेतल्या आहेत.
पहिल्याच सामन्यात बडोद्यासमोर मुंबईचं आव्हान
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बडोदासमोर गतविजेत्या मुंबईचं आव्हान असणार आहे. कृणाल पंड्या बडोद्याचं तर अजिंक्य रहाणे मुंबईचं नेतृत्व करणार आहे. मुंबई विरुद्ध बडोदा यांच्यातील सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे कोतंबी स्टेडियम, बडोदा येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेलवर पाहायला मिळतील. तर सर्व सामने हे मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येतील.
रोहित शर्माचा कोण?
दरम्यान रोहित शर्मा या स्पर्धेत जम्मू-काश्मीरचं प्रतिनिधित्व करणार आहे. मात्र हा खेळाडू टीम इंडियाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा नाही. तर हा दुसरा रोहित शर्मा आहे. पारस डोगरा हा जम्मू-काश्मीरचं नेतृत्व करणार आहे. तसेच या संघात टीम इंडियाकडून खेळलेला वेगवान गोलंदाज’जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिक याचाही समावेश आहे.
मुंबई क्रिकेट टीम: अजिंक्य रहाणे (कॅप्टन), श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, अंगकृष रघुवंशी, पृथ्वी शॉ, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), तनुष कोटियन, शम्स मुलानी, मोहित अवस्थी, शार्दूल ठाकुर, सिद्धांत अद्धतराव, रॉयस्टन डायस, हिमांशु सिंह, आयुष म्हात्रे, मोहम्मद जुनेद खान आणि सूर्यांश शेडगे.
बडोदा क्रिकेट टीम: कृणाल पंड्या (कर्णधार), विष्णु सोलंकी (उपकर्णधार), प्रियांशु मोलिया, मितेश पटेल (विकेटकीपर), शिवालिक शर्मा, अतीत शेठ, आकाश सिंह, भार्गव भट्ट , राज लिम्बानी, लुकमान मेरिवाला, ज्योत्सनील सिंह, अक्षय मोरे, सुकीर्त पांडे, महेश पिथिया, अभिमन्युसिंह राजपूत, निनाद राठवा, शाश्वत रावत आणि लक्षित टोकसिया.
महाराष्ट्र क्रिकेट टीम: ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), निखिल नाईक (उपकर्णधार आणि विकेटकीपर), अंकित बावने, सचिन धस, अर्शिन कुलकर्णी, रजनीश गुरबानी, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सत्यजीत बच्चाव, मंदार भंडारी, प्रदीप दाधे, रामकृष्ण घोष, हर्षल केट, अजीम काजी, मुर्तजा ट्रंकवाला, सिद्धेश वीर आणि हितेश वाळुंज.
विदर्भ क्रिकेट टीम: अक्षय वाडकर (कर्णधार आणि विकेटकीपर), अमन मोखडे, करुण नायर, यश राठोड, अथर्व तायडे (उपकर्णधार), नचिकेत भुटे, हर्ष दुबे, अक्षय कर्णेवार, आदित्य ठाकरे, अक्षय वाखरे, उमेश यादव, प्रफुल्ल हिंगे, यश कदम, शुभम कापसे, मंदार महाले, दानिश मालेवार आणि सिद्धेश वाथ.
आंध्र क्रिकेट टीम: रिकी भुई (कर्णधार), शेख रशीद (उपकर्णधार), अश्विन हेब्बार, श्रीकर भरत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, हनुमा विहारी, मैरामरेड्डी रेड्डी, ललित मोहन, महीप कुमार, मनीष गोलामारू, मोहम्मद रफी, सत्यनारायण राजू, अभिषेक रेड्डी, चीपुरापल्ली स्टीफन, वामसी कृष्णा आणि त्रिपुराना विजय.
आसाम क्रिकेट टीम: डेनिश दास (कर्णधार आणि विकेटकीपर), सिबसंकर रॉय, राहुल सिंह, सिद्धार्थ सरमाह, भार्गव दत्ता, ऋषव दास, मृण्मय दत्ता, सुमित घाडीगांवकर, राहुल हजारिका, मुख्तार हुसैन, परवेज मुसरफ, रूहीनंदन पेगु, कुणाल सरमा, आकाश सेनगुप्ता आणि अभिषेक ठाकुरी.
बंगाल क्रिकेट टीम: अनुस्तुप मजूमदार (कर्णधार), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सुदीप चटर्जी, अभिमन्यु ईश्वरन, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रितिक चटर्जी, शाहबाज अहमद, आकाश दीप, आमिर गनी, सुदीप कुमार घरामी, एविलिन घोष, सूरज सिंधु जयसवाल, मोहम्मद कैफ, मुकेश कुमार, प्रदीप्ता प्रमाणिक, रिशव विवेक, रोहित कुमार, शुवम डे आणि युधाजीत गुहा
बिहार क्रिकेट टीम: वीर प्रताप सिंह (कर्णधार), साकिबुल गनी (उपकर्णधार), बाबुल कुमार, ऋषव राज, सचिन कुमार, साकिब हुसैन, अभिजीत साकेत, मयंक चौधरी, हिमांशु सिंह, ऋषी राज, आयुष लोहारूका, शरमन निग्रोध, रघुवेंद्र प्रताप सिंह, अनुज राज, शब्बीर खान, हर्ष सिंह, जितिन यादव आणि यशपाल यादव
चंडीगड क्रिकेट टीम: मनन वोहरा (कर्णधार), राज बावा, गुरींदर सिंह, संदीप शर्मा, आयुष सिक्का, अरिजीत पन्नू, अर्सलान खान, शिवम भांबरी , रोहित ढांडा, गौरव पुरी, जगजीत सिंह, विशु कश्यप, अंकित कौशिक, निशंक बिडला आणि मयंक सिद्धू
छत्तीसगड क्रिकेट टीम: एकनाथ केरकर (विकेटकीपर), भूपेन लालवानी, अजय मंडल, शशांक सिंह, शुभम अग्रवाल, आशुतोष सिंह, आयुष पांडे, जिवेश बट्टे, आशीष चौहान, संजीत देसाई, अमनदीप खरे, रवी किरण, ऋषभ तिवारी, अनुज तिवारी, वाशुदेव बरे आणि विश्वास मलिक.
दिल्ली क्रिकेट टीम: हिम्मत सिंह (कर्णधार), अनुज रावत (विकेटकीपर), आयुष बडोनी, यश ढुल, क्षितिज शर्मा, नवदीप सैनी, रितिक शौकीन, हर्ष त्यागी, सिमरजीत सिंह, शिवांक वशिष्ठ, हिमांशु चौहान, ध्रुव कौशिक, मनी ग्रेवाल, जोंटी सिद्धू, मयंक रावत, दिविज मेहरा, सुमित माथुर, प्रणव राजुवंशी आणि सनत सांगवान.
गुजरात क्रिकेट टीम: चिंतन गाजा (कर्णधार), आर्या देसाई, प्रियांक पांचाल, हेत पटेल, उर्विल पटेल (विकेटकीपर), अर्जन नागवासवाला, उमंग कुमार (उपकप्तान), सिद्धार्थ देसाई, मनन हिंगराजिया, प्रियाजित्सिंग जडेजा, तेजस पटेल, जयमीत पटेल, ऋषि पटेल, रिंकेश वाघेला आणि विशाल जयसवाल.
हिमाचल प्रदेश क्रिकेट टीम: अंकुश बैंस (विकेटकीपर), प्रशांत चोपडा, एकांत सेन, ऋषि धवन, मयंक डागर, नवीन कंवर, वैभव अरोडा, अर्पित गुलेरिया, अभिषेक कुमार, अमन जैनवाल, अमित कुमार, अभिनंदन भारद्वाज, दिवेश शर्मा, अंकित कलसी, मुकुल नेगी, रजत वर्मा, रोहित ठाकुर, शुभम अरोड़ा आणि विपिन शर्मा.
हैदराबाद क्रिकेट टीम: तिलक वर्मा (कर्णधार), तन्मय अग्रवाल, तनय त्यागराजन, चामा मिलिंद, रक्षण रेडी, राहुल सिंह (उपकर्णधार), अभिरथ रेड्डी, अनिकेथरेड्डी, धीरज गौड़, कार्तिकेय काक, सरनु निशांत, नितेश रेड्डी, राहुल रादेश, रोहित रायडू आणि कोडिमेला हिमातेजा.
जम्मू-कश्मीर क्रिकेट टीम: पारस डोगरा (कर्णधार), शुभम खजूरिया (उपकर्णधार), अब्दुल समद, उमरान मलिक, अभिनव पुरी, शुभम पुंडीर, आबिद मुश्ताक, विवरांत शर्मा, रसिख सलाम, रोहित शर्मा, युद्धवीर सिंह, औकिब नबी, अहमद बंदे, साहिल लोत्रा आणि शिवांश शर्मा.
झारखंड क्रिकेट टीम: इशान किशन (कर्णधार आणि विकेटकीपर), विराट सिंह (उपकर्णधार), कुमार कुशाग्र (विकेटकीपर), अनुकूल रॉय, उत्कर्ष सिंह, सुप्रियो चक्रवर्ती, मनीषी, नाजिम सिद्दीकी, पंकज रौनक, रवि कुमार यादव, सौरभ शेखर, आर्यमान सेन, शरणदीप सिंह, कुमार सूरज, विवेकानंद तिवारी आणि विकास कुमार.
कर्नाटक क्रिकेट टीम: मयंक अग्रवाल (कर्णधार), मनीष पांडे (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा, विजयकुमार वैश्य निकिन जोस, देवदत्त पडिक्कल, सुजय सातेरी (विकेटकीपर), लवनिथ सिसौदिया (विकेटकीपर), आर स्मरण, श्रेयस गोपाल, अभिलाष शेट्टी, वासुकी कौशिक, विद्याधर पाटील, किशन बेदारे, हार्दिक राज आणि मोहसिन खान.
केरळ क्रिकेट टीम: सचिन बेबी (कर्णधार), मोहम्मद अज़हरुद्दीन (विकेटकीपर), विष्णु विनोद (विकेटकीपर), केएम आसिफ, बासिल थम्पी, बाबा अपराजित, जलज सक्सेना, आदित्य सरवटे, एमडी निधिश, अक्षय चंद्रन, फाजिल फानूस, वाथसल गोविंद, कृष्णा प्रसाद, रोहन कुन्नूमल आणि सलमान निजार.
मध्य प्रदेश क्रिकेट टीम: शुभम शर्मा (कर्णधार), हरप्रीत सिंह, रजत पाटीदार, सुभ्रांशु सेनापति, वेंकटेश अय्यर, आवेश खान, कुमार कार्तिकेय, कुलवंत खेजरोलिया, अनुभव अग्रवाल, यश दुबे, हर्ष गवली, सारांश जैन, हिमांशु मंत्री, आर्यन पांडे आणि सागर सोलंकी.
मेघालय क्रिकेट टीम: किशन लिंगदोह (कर्णधार), बालचंदर अनिरुद्ध, सुमित कुमार (विकेटकीपर), दिप्पू संगमा (उपकर्णधार), अर्पित भटेवरा, आर्यन बोरा, आकाश चौधरी, बिजोन डे, राम गुरुंग, जसकीरत सिंह सचदेवा, चेंगकम संगमा, बामनभा शांगप्लियांग, स्वराजजीत दास, रोशन वारबाह, शेम्बलंग पिंगरोपे आणि अजय दुहान.
ओडिशा क्रिकेट टीम: गोविंदा पोद्दार (कर्णधार), बिप्लब सामंत्रे, सूर्यकांत प्रधान, अनिल परिदा, कार्तिक बिस्वाल, राजेश धूपर, संदीप पटनायक, देबब्रत प्रधान, राजेश मोहंती, हर्षित राठोड, सुनील राउल, स्वास्तिक सामल, अनुराग सारंगी, शांतनु मिश्रा, सुमित शर्मा, आशीर्वाद स्वैन आणि तरानी सा.
पुडुचेरी क्रिकेट टीम: अरुण कार्तिक (कर्णधार आणि विकेटकीपर), अमन खान, अंकित शर्मा (उपकर्णधार), अबिन मैथ्यू, फैबिद अहमद, गौरव यादव, आकाश करगावे, मारीमुथु विकनेश्वरन, परमेश्वरन शिवरामन, प्रेमराज राजवेलु, रामचंद्रन रघुपति, रितेश गुडगे, अजय रोहेरा, पारस रत्नपारखे, सागर उदेशी आणि सौरभ यादव.
पंजाब क्रिकेट टीम: प्रभसिमरन सिंह (कर्णधार आणि विकेटकीपर), नमन धीर (उपकर्णधार), अनमोलप्रीत सिंह, रमनदीप सिंह, नेहल वढेरा, सनवीर सिंह, बलतेज सिंह, गुरनूर बराड़, सिद्दार्थ कौल, मयंक मार्कंडे, सलील अरोडा, अभय चौधरी, सहज धवन, प्ररीत दत्ता, इमानजोत सिंह चहल, जसकरनवीर सिंह पॉल, जसिंदर सिंह, कोविद गुज्जर, कृष भगत, प्रबजोत सिंह, पुखराज मान आणि सुखविंदर सिंह.
रेल्वे क्रिकेट टीम: प्रथम सिंह (कर्णधार), सूरज आहूजा (विकेटकीपर), विवेक सिंह, उपेन्द्र यादव (विकेटकीपर), आशुतोष शर्मा (उपकर्णधार), युवराज सिंह, कर्ण शर्मा, अयान चौधरी, शिवम चौधरी, कुणाल यादव, भार्गव मेराई, मोहम्मद सैफ, रजत निर्वाल, आकाश पांडे, हिमांशु सांगवान आणि आदर्श सिंह.
राजस्थान क्रिकेट टीम: दीपक हुडा (कर्णधार), कुणाल सिंह राठोड (विकेटकीपर), अभिजीत तोमर, महिपाल लोमरोर, मानव सुथार, खलील अहमद, कुकना अजय सिंह, अराफात खान, राहुल चाहर, दीपक चाहर, अनिकेत चौधरी, भरत शर्मा , राम चौहान, सलमान खान आणि यश कोठारी.
सौराष्ट्र क्रिकेट टीम: जयदेव उनादकट (कर्णधार), हार्विक देसाई (विकेटकीपर), शेल्डन जैक्सन (विकेटकीपर), चेतेश्वर पुजारा, तरंग गोहेल (विकेटकीपर), अर्पित वासवदा, चिराग जानी, प्रेरक मांकड, युवराजसिंह डोडिया, धर्मेंद्रसिंह जडेजा, पार्थ भुट, विश्वराज जड़ेजा, हितेन कन्बी, नवनीत वोरा आणि पार्श्वराज राणा.
सर्विसेज क्रिकेट टीम: रजत पालीवाल, अमित शुक्ला, अरुण कुमार, वरुण चौधरी, जयंत गोयत, लवकेश बंसल, पुलकित नारंग, नितिन यादव, पूनम पूनिया, रवि चौहान, शुभम रोहिल्ला, अर्जुन शर्मा , नितिन तंवर आणि सूरज वशिष्ठ
तमिळनाडु क्रिकेट टीम: साई किशोर (कर्णधार), नारायण जगदीसन (उपकर्णधार आणि विकेटकीपर), सी आंद्रे सिद्दार्थ, बाबा इंद्रजीत, बूपति कुमार, एम शाहरुख खान, साई सुदर्शन, सुरेश लोकेश्वर (विकेटकीपर), प्रदोष रंजन पॉल (विकेटकीपर), लक्ष्य जैन, विजय शंकर, सोनू यादव, अजित राम, गुरजापनीत सिंह, मोहम्मद अली, मोहम्मद मोहम्मद, संदीप वॉरियर आणि मणिमारन सिद्धार्थ.
त्रिपुरा क्रिकेट टीम: मनदीप सिंह (कर्णधार), बिक्रमकुमार दास, रजत डे, श्रीनिवास शरथ (विकेटकीपर), मणिसंकर मुरांघ (उपकर्णधार), श्रीदाम पॉल, परवेज सुल्तान, शंकर पॉल, राणा दत्ता, अजय सरकार, जॉयदीप बानिक, सौरभ दास, बिक्रमजीत देबनाथ, तेजस्वी जयसवाल, जीवनजोत सिंह आणि संदीप सरकार.
उत्तर प्रदेश क्रिकेट टीम: आर्यन जुयाल (कर्णधार आणि विकेटकीपर), स्वास्तिक चिकारा, प्रियम गर्ग, माधव कौशिक, अक्षदीप नाथ, नितीश राणा, सौरभ कुमार, अंकित राजपूत, यश दयाल, आदित्य शर्मा, आकिब खान, कृतज्ञ सिंह, विप्रज निगम, शिवम शर्मा, सिद्धार्थ यादव आणि विजय कुमार.
उत्तराखंड क्रिकेट टीम: रवीकुमार समर्थ, आदित्य तरे (विकेटकीपर), युवराज चौधरी, मयंक मिश्रा, अभय नेगी, दीपक धपोला, आकाश मधवाल, स्वप्निल सिंह, अंकित मनोरी, अवनीश सुधा, वैभव भट्ट, हिमांशु बिष्ट, देवेन्द्र सिंह बोरा, कुणाल चंदेला आणि अखिल रावत.