Ranji Trophy Final | मुंबईसमोर विदर्भाचं कडवं आव्हान, दोघांपैकी सरस कोण?
Ranji Trophy Final | रणजी ट्रॉफीसाठी मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. उभयसंघ अंतिम सामन्यात पोहचण्याची पहिलीच वेळ आहे. मुंबईच्या तुलनेत विदर्भाला अंतिम सामन्यात खेळण्याचा अनुभव फारसा नाही. मात्र विदर्भाची आकडेवारी पाहता मुंबईलाही कंबर कसावी लागणार आहे.
मुंबई | रणजी ट्रॉफी 2023-2024 साठी दोन्ही संघ ‘फायनल’ झाले आहेत. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबईने अंतिम फेरीत धडक मारल्यानतंर आता विदर्भाने मध्यप्रदेशचा धुव्वा उडवत फायनलमध्ये एन्ट्री घेतली. एकाच राज्यातील दोन्ही संघ पोहचण्याची ही दुसरीच वेळ ठरली आहे. एकाच राज्यातील दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहचल्याने रणजी ट्रॉफी महाराष्ट्रात राहणार असल्याचं निश्चित झालं आहे. मुंबईचा गेल्या काही वर्षांचा अपवाद वगळता रणजी ट्रॉफीवर एकहाती वर्चस्व राहिलं आहे. मात्र त्यानंतरही मुंबईसमोर विदर्भाचं आव्हान असणार आहे.
विदर्भाने 6 मार्च रोजी दुसऱ्या सेमी फायनलमध्ये मध्यप्रदेशवर मात केली. विदर्भ यासह रणजी ट्रॉफी फायनलमध्ये 5 वर्षांनंतर पोहचली. विदर्भाची गाठ अंतिम फेरीत मुंबईसोबत आहे. मुंबईची रणजी स्पर्धेत एकहाती सत्ता राहिली आहे. मात्र विदर्भाला हलक्याच घेऊन जमणार नाही. त्याचं कारण आहे ते विदर्भाची रणजी ट्रॉफी फायनलमधील कामगिरी.
विदर्भ रणजी ट्रॉफी फायनलमध्ये अजिंक्य
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात विदर्भ क्रिकेट टीमने एकूण 2 वेळा अंतिम फेरीत धडक मारली आहे. विदर्भाने दोन्ही वेळेस अंतिम सामन्यात विजय मिळवत रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. विदर्भाने 2017-2018 मध्ये पहिल्यांदा सौराष्ट्राचा धुव्वा उडवला होता. तर त्यानंतर पुढील वर्षात दिल्लीला धुळ चारत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावला होतं. तर मुंबईने 47 पैकी 41 वेळा फायनलमध्ये विजय मिळवलाय. आता मुंबई विरुद्ध विदर्भ फायनलमध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे विदर्भ तिसऱ्या वेळेत यशस्वी ठरते की मुंबई आपलं वर्चस्व गाजवणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
विदर्भ क्रिकेट टीम | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, यश राठोड, करुण नायर, आदित्य सरवटे, यश ठाकुर, उमेश यादव, आदित्य ठाकरे, अक्षय वाखारे, अमन मोखाडे, मोहित काळे, हर्ष दुबे, फैज फजल, संजय राठोड, रजनीश गुरबानी, ललित एम यादव, सिद्धेश वाठ, जितेश शर्मा, दर्शन नळकांडे आणि शुभम दुबे.
मुंबई क्रिकेट टीम | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, भूपेन लालवाणी, मुशीर खान, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, तुषार देशपांडे, सूर्यांश शेडगे, धवल कुलकर्णी, रोस्टा, गोयस, जैस, गौतम शिवम दुबे, अथर्व अंकोलेकर, प्रसाद पवार, अमोघ भटकळ, सुवेद पारकर आणि सिल्वेस्टर डीसूझा.