Cricket : कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय चाहत्यांना आणखी एक झटका
Cricket : भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुढील आणखी काही महिने प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नक्की काय झालंय? जाणून घ्या.
न्यूझीलंडने टीम इंडियाला कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या दिवशी पराभूत केलं. न्यूझीलंडने या विजयासह टीम इंडियाला 3-0 अशा फरकाने व्हाईटवॉश दिला. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना आणखी एक झटका लागला आहे. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वात आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यानंतर शमीबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. शमीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅकसाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शमीचा बंगळुरु आणि इंदूरमध्ये होणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पुढील 2 फेऱ्यांसाठी बंगाल संघात समावेश करण्यात आलेला नाही.
मोहम्मद शमी वनडे वर्ल्ड कप फायनल 2023 पासून टीम इंडियातून दुखापतीमुळे बाहेर आहे. शमी या आठवड्यात रणजी ट्रॉफीतून पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याचं निश्चित म्हटलं जात होतं. त्यामुळे शमीच्या कमबॅककडे साऱ्यांचं नजरा लागून होत्या. शमी रणजी ट्रॉफीत चौथ्या आणि पाचव्या फेरीत अनुक्रमे कर्नाटक आणि मध्य प्रदेश विरुद्ध खेळण्यासाठी तयार होता. मात्र दुखापतीमुळे त्याची बंगाल संघात निवड करण्यात आली नाही.
शमीवर फेब्रुवारी महिन्यात लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शमीची मायदेशात बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र गुडघा सुजल्याने शमीला या दोन्ही मालिकांना मुकावं लागलं आणि पुनरागमनाची प्रतिक्षा आणखी वाढली.
ऋद्धीमान साहाचा अखेरचा हंगाम
दरम्यान टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज ऋद्धीमान साहा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृ्ती जाहीर केली आहे. साहाचा रणजी ट्रॉफी स्पर्धेतील हा अखेरचा हंगाम असणार आहे. त्यानंतर निवृत्त होणार असल्याची माहिती साहाने दिली आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील चौथ्या आणि पाचव्या फेरीसाठी बंगाल टीम : अनुस्तूप मजूमदार, ऋद्धीमान साहा, सुदीप चटर्जी, सुदीप कुमार घरामी, शाहबाज अहमद, रितिक चटर्जी, एविलिन घोष, शुवम डे, शाकिर हबीब गांधी, प्रदीप प्रमाणिक, आमिर गनी, इशान पोरेल, सूरज सिंधु जयसवाल, एमडी कॅफ, रोहित कुमार आणि रिशव विवेक.