Ranji Trophy Final रंगतदार वळणावर, कॅप्टन वाडकर-दुबेची शानदार खेळी, विदर्भाच्या आशा वाढल्या
Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final | रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भाने पाचव्या दिवसाची जोरदार सुरुवात करत मुंबईला चांगलंच झुंजवलंय. विदर्भाचा कॅप्टन अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे या दोघांनी केलेल्या नाबाद शतकी भागीदारीमुळे विजयाचा आशा जाग्या झाल्या आहेत.
मुंबई | मुंबई विरुद्ध विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफी फायनलमधील पाचव्या दिवसाचा खेळ सुरु आहे. विदर्भाने पाचव्या दिवसातील पहिलं सत्र आपल्या नावावर केलं. विदर्भाने 538 धावांचा पाठलाग करताना लंचपर्यंत 5 विकेट्स गमावून 333 धावा केल्या. त्यामुळे विदर्भाला विजयासाठी आणखी 205 धावांची गरज आहे. कॅप्टन अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी केली. त्यामुळे विदर्भाच्या विजयाची आशा वाढली आहे. तसेच मुंबई बॅकफुटवर गेली आहे.
विदर्भाने चौथ्या दिवसापर्यंत 92 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 248 धावा केल्या होत्या. अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे या दोघांनी पाचव्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. त्यानंतर या दोघांनी पहिल्या सत्रात एकही विकेट न गमावता 33 ओव्हरमध्ये 2.58 च्या रन रेटने नाबाद 85 धावा जोडल्या. हर्ष दुबे याने या दरम्यान अर्धशतक ठोकलं. तर कॅप्टन वाडकर शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे. दुबे आणि वाडकर दोघेही अनुक्रमे नाबाद 92 आणि 57 धावा केल्या आहेत. या दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी नाबाद 110 धावांची भागीदारी झाली आहे. आता विदर्भाने आणखी 205 धावा केल्यास तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्याचा मान पटकवेल.
दरम्यान विदर्भाने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. विदर्भाचा पहिला डाव प्रत्युत्तरात 105 धावांवर आटोपला. त्यामुळे मुंबईला 119 धावांची आघाडी मिळाली. तर त्यानंतर मुशीर खान याचं शतक, श्रेयस अय्यर, कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि शम्स मुलानी या तिघांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने 418 धावा केल्या. त्यामुळे विदर्भाला 538 धावांचं आव्हान मिळालं.
विदर्भ बाजी मारणार का?
Lunch on Day 5!
A good session for Vidarbha. They scored 85/0.
A superb 110*-run stand between Akshay Wadkar and Harsh Dubey takes Vidarbha to 333/5, needing 205 more runs to win.#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank | #Final | #MUMvVID
Follow the match ▶️ https://t.co/k7JhkLhOID pic.twitter.com/ssY9wvy3wz
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 14, 2024
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.