MUM vs VID | मुंबई विरुद्ध विदर्भ रणजी ट्रॉफी महाअंतिम सामना कधी आणि कुठे?
Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final Live Streaming | विदर्भाने मध्यप्रदेशला पराभूत केल्यानंतर रणजी ट्ऱॉफी फायनलसाठी दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. आता महाअंतिम सामना कधी आणि कुठे होणार?
मुंबई | अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आणि सामन्यांनंतर अखेर रणजी ट्रॉफी स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. मुंबई विरुद्ध विदर्भ या महाराष्ट्रातील संघांमध्ये रणजी ट्रॉफीसाठीचा महाअंतिम सामना होणार आहे. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई विदर्भा विरुद्ध 2 हात करण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला अक्षय वाडकर याच्या खांद्यावर विदर्भाची मदार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? तसेच टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार हे जाणून घेऊयात.
मुंबई विरुद्ध विदर्भ महाअंतिम सामना केव्हा?
मुंबई विरुद्ध विदर्भ महाअंतिम सामना रविवारी 10 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे.
मुंबई विरुद्ध विदर्भ महाअंतिम सामना कुठे?
मुंबई विरुद्ध विदर्भ महाअंतिम सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
मुंबई विरुद्ध विदर्भ महाअंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
मुंबई विरुद्ध विदर्भ महाअंतिम सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल.
रविवारी 10 मार्चपासून फायनल
Presenting the finalists of the @IDFCFIRSTBank #RanjiTrophy 2023-24! 👏👏
Mumbai 🆚 Vidarbha
🗓️ 10th to 14th March 🏟️ Wankhede Stadium, Mumbai#Final | #MUMvVID
Follow the match LIVE on https://t.co/pQRlXkCguc and the official BCCI App pic.twitter.com/gmnCSIeVBz
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 6, 2024
मुंबई विरुद्ध विदर्भ महाअंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
मुंबई विरुद्ध विदर्भ महाअंतिम सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल.
मुंबई विरुद्ध विदर्भ महाअंतिम सामना मोबाईलवर कुठे बघायला मिळेल?
मुंबई विरुद्ध विदर्भ महाअंतिम सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर बघता येईल.
विदर्भ क्रिकेट टीम | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, यश राठोड, करुण नायर, आदित्य सरवटे, यश ठाकुर, उमेश यादव, आदित्य ठाकरे, अक्षय वाखारे, अमन मोखाडे, मोहित काळे, हर्ष दुबे, फैज फजल, संजय राठोड, रजनीश गुरबानी, ललित एम यादव, सिद्धेश वाठ, जितेश शर्मा, दर्शन नळकांडे आणि शुभम दुबे.
मुंबई क्रिकेट टीम | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, भूपेन लालवाणी, मुशीर खान, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, तुषार देशपांडे, सूर्यांश शेडगे, धवल कुलकर्णी, रोस्टा, गोयस, जैस, गौतम शिवम दुबे, अथर्व अंकोलेकर, प्रसाद पवार, अमोघ भटकळ, सुवेद पारकर आणि सिल्वेस्टर डीसूझा.