33 चौकार आणि 21 षटकार, इतक्या बॉलमध्ये त्रिशतक, तन्मय अग्रवालचा तडाखा
Tanmay Agarwal Triple Century | तन्यम अग्रवाल याने इतिहास रचला आहे. तन्मय याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्रिशतक ठोकलंय. तन्मयने या खेळीत चौफेर फटकेबाजी करत फलंदाजांचा झोडून काढला.
मुंबई | भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत अरुणाचल प्रदेश क्रिकेट टीमच्या तन्मय अग्रवाल याने इतिहास रचला आहे. तन्मय अग्रवाल याने त्रिशतक ठोकलं आहे. आता तन्मय सर्वात मोठा रेकॉर्ड ब्रेक करण्याचा उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे. तन्मयमुळे वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा याच्या नाबाद 501 धावांच्या विक्रमावर टांगती तलवार आली आहे. तन्मयला लाराचा रेकॉर्ड ब्रेक करुन पराक्रम करण्याची संधी आहे. तन्मयने या त्रिशतकी खेळी दरम्यान किती चेंडूचा सामना केला? किती सिक्स ठोकले हे जाणून घेऊयात.
अरुणाचल प्रदेश विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना सुरु आहे. तन्मयने या सामन्यात हैदराबादकडून खेळताना अरुणाचल प्रदेश विरुद्ध अवघ्या 160 बॉलमध्ये 21 सिक्स आणि 33 चौकारांच्या मदतीने नाबाद 323 धावा केल्या आहेत. तन्मयने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 54 बॉलमध्ये 258 धावा केल्या. तन्मय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान त्रिशतक करणारा फलंदाज ठरला. तन्मयने फक्त 147 बॉलमध्ये हे त्रिशतक झळकावलं.
तन्मय फक्त त्रिशतकच नाही, तर वेगवान द्विशतक करणाराही पहिलात फलंदाज ठरला आहे. तन्मयने अवघ्या 119 चेंडूत द्विशतक पूर्ण केलं. तर द्विशतकापासून ते त्रिशतकासाठी तन्मयला केवळ 28 बॉलचा सामना करावा लागला. तसेच तन्मयने 21 सिक्ससह रणजी ट्रॉफी स्पर्धेतील एका डावात सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला.
ब्रायन लाराचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
दरम्यान फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम हा ब्रायन लारा याच्या नावावर आहे. लाराने नाबाद 501 धावा केल्या आहेत. आता तन्मय सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लाराचा रेकॉर्ड ब्रेक करतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
तन्मयची त्रिशतकी खेळी
Magnificent! 🤯
Hyderabad’s Tanmay Agarwal has hit the fastest triple century in First-Class cricket, off 147 balls, against Arunachal Pradesh in the @IDFCFIRSTBank #RanjiTrophy match 👌
He’s unbeaten on 323*(160), with 33 fours & 21 sixes in his marathon knock so far 🙌 pic.twitter.com/KhfohK6Oc8
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 26, 2024
हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन | गहलौत राहुल सिंग (कॅप्टन), तन्मय अग्रवाल, रोहित रायडू, चामा व्ही मिलिंद, कार्तिकेय-काक, सागर चौरसिया, एल्लीगाराम संकेथ, अभिरथ रेड्डी, तनय त्यागराजन, के नितेश रेड्डी आणि पलाकोडेती साकेथ साईराम.
अरुणाचल प्रदेश प्लेईंग ईलेव्हन | नीलम ओबी (कर्णधार), तेची डोरिया, अप्रमेया जैस्वाल, अभिषेक मृणाल, देसाई विरेनकुमार, इंडिया टोकू, संतू कुमार, टेची सोनम, नबम टेंपोल, दिव्यांशु यादव आणि सुहास पम्पाना.