श्रेयस अय्यर टीम इंडियातून गेली काही महिने दूर आहे. श्रेयसला वार्षिक करारातूनही वगळण्यात आलंय. श्रेयसला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी 20i आणि ऑस्टेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही संधी देण्यात आलेली नाही. मात्र श्रेयसने या सर्वाला बॅटने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. श्रेयसने रणजी ट्रॉफी स्पर्धेत सलग दुसरं शतक ठोकत टीकाकारांचं तोंड बंद केलं आहे. श्रेयसच्या या शतकी खेळीमुळे मुंबईने 300 पार मजल मारली आहे. आता श्रेयसकडून द्विशतकी खेळीची अपेक्षा असणार आहे.
रणजी ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेत मुंबई विरुद्ध ओडीशा यांच्यात बीकेसीतील शरद पवार क्रिकेट अकादमी येथे सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी श्रेयस अय्यर याने शतक ठोकलंय. श्रेयसने ओडीशाविरुद्ध वनडे स्टाईल बॅटिंग करत शतक झळकावलं. श्रेयसच्या या शतकी खेळीसह मुंबईने 300 पार मजल मारली आहे. श्रेयसने 101 बॉलमध्ये 14 फोर आणि 2 सिक्ससह हे शतक पूर्ण केलं. श्रेयसच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील हे 15 वं शतक ठरलं. श्रेयसने त्यानंतर 61 बॉलमध्ये पुढील 50 धावा केल्या. श्रेयसने यासह 162 बॉलमध्ये 150 धावा पूर्ण केल्या.
श्रेयसने याआधी महाराष्ट्रविरुद्ध शतक केलं होतं. मात्र त्यानंतर श्रेयसला त्रिपुराविरूद्धच्या सामन्यात खांद्याच्या दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली होती. मात्र त्यानंतर श्रेयसने आता पुन्हा शतक ठोकण्यात यश मिळवलं आहे. श्रेयसने महाराष्ट्रविरुद्ध 190 बॉलमध्ये 142 रन्स केल्या होत्या.श्रेयसने या खेळीत 12 चौकार आणि 4 षटकार लगावले होते. श्रेयसला या शतकासाठी तब्बल 11 महिन्यांची प्रतिक्षा करावी लागली होती.
दरम्यान श्रेयसची श्रीलंका दौऱ्याततील एकदिवसीय मालिकेत निवड करण्यात आली होती. मात्र श्रेयसला त्या मालिकेत काही खास करता आलं नव्हतं. तसेच श्रेयसने अखेरचा कसोटी सामना हा फेब्रुवारी 2024 मध्ये खेळला होता. त्यानंतर श्रेयसला त्यानंतर वार्षिक करारातूनही वगळण्यात आलं होतं. मात्र श्रेयस न खचता रणजी ट्रॉफीत उल्लेखनीय कामगिरी करत आहे.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकुर, हिमांशू वीर सिंग, शम्स मुलानी आणि रॉयस्टन डायस.
ओडिशा प्लेइंग इलेव्हन : गोविंदा पोद्दार (कॅप्टन), अनुराग सारंगी, स्वस्तिक सामल, संदीप पट्टनायक, बिप्लब सामंतरे, कार्तिक बिस्वाल, आसीरवाद स्वेन (विकेटकीपर), देबब्रत प्रधान, सूर्यकांत प्रधान, हर्षित राठोड आणि सुनील राऊल.