Ranji Trophy | श्रेयस अय्यरची निराशाजनक कामिगिरी, अजिंक्य पुन्हा अपयशी

Mumbai vs Tamil Nadu Semi Final | कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोघेही निर्णायक सामन्यात अपयशी ठरले आहेत. रहाणेने चिवट खेळी केली, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

Ranji Trophy | श्रेयस अय्यरची निराशाजनक कामिगिरी, अजिंक्य पुन्हा अपयशी
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 1:14 PM

मुंबई | तामिळनाडू विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सेमी फायनलमध्ये मुंबई क्रिकेट टीम अडचणीत सापडली आहे. तामिळनाडूच्या 146 धावांचा पाठलाग करताना मुशीर खान याचा अपवाद वगळता मुंबईचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले आहेत. दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत मुंबईने 51 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 125 धावा केल्या. मुंबई अजूनही 21 धावांनी पिछाडीवर आहे. मुंबईचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याने पुन्हा एकदा निराशा केली. तर बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतलेल्या श्रेयस अय्यर याचं निराशाजनक कमबॅक राहिलं. मात्र मुशीर खान याने केलेल्या अर्धशतकामुळे मुंबईला 100 पार मजल मारता आली.

मुंबईची बॅटिंग

मुंबईची पहिल्या डावातील सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ 5, भुपेन ललवाणी 15 आणि मोहित अवस्थी 2 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे मुंबईचा स्कोअर 3 आऊट 48 असा झाला. मात्र त्यानंतर मुशीर खान आणि कॅप्टन रहाणे या दोघांनी चिवट खेळी करुन डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र यात दोघांना फार यश आलं नाही. तामिळनाडूचा कॅप्टनने मुंबईचा कॅप्टन रहाणेला आऊट केलं. रहाणेने चिवट झुंज दिली. पण त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. रहाणेने 67 बॉलमध्ये 2 फोरसह 19 धावा केल्या.

रहाणेनंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. श्रेयसकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. मुंबई अडचणीत असल्याने श्रेयसकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण श्रेयसने निराशा केली. श्रेयस 8 बॉलमध्ये 3 धावा करुन माघारी परतला. दुसऱ्या बाजूला मुशीर खान याने अर्धशतक ठोकलं. मुंबई अडचणीत असताना मुशीरने काही वेळ आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. मात्र मुशीर अर्धशतकानंतर 5 धावा जोडू शकला. मुशीरने 131 बॉलमध्ये 6 चौकारांसह 55 धावा केल्या. मुशीरनंतर त्याच ओव्हरमध्ये शम्स मुलानी याने आपली विकेट टाकली. शम्सला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे मुंबईची स्थिती 7 बाद 148 झाली. आता हार्दिक तामोरे आणि शार्दुल ठाकुर या दोघांवर मुंबईची मदार आहे.

मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, भूपेन लालवाणी, मुशीर खान, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे.

तामिळनाडू प्लेईंग ईलेव्हन | रविश्रीनिवासन साई किशोर (कॅप्टन), एन जगदीसन (विकेटकीपर), साई सुदर्शन, बाबा इंद्रजीथ, प्रदोष पॉल, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, एम मोहम्मद, एस अजित राम, संदीप वॉरियर आणि कुलदीप सेन.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.