Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराट क्लिन बोल्ड, स्टंप उडून पहिल्या स्लिपपर्यंत, बॉलरचा कोहलीसारखाच जल्लोष, पाहा व्हीडिओ

Virat Kohli Clean Bowled Ranji Trophy Video : विराट कोहलीला घरच्या मैदानात अशाप्रकारे आऊट व्हावं लागलं. क्लिन बोल्ड झाल्यानंतर स्टंप 3-4 वेळा गोलांट्या घेत पहिल्या स्लिपच्या जवळपास गेला.

Virat Kohli : विराट क्लिन बोल्ड, स्टंप उडून पहिल्या स्लिपपर्यंत, बॉलरचा कोहलीसारखाच जल्लोष, पाहा व्हीडिओ
Virat Kohli Was Clean bowled By Himanshu Sangwan
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 12:15 PM

रोहित शर्मा आणि टीम इंडियाच्या इतर खेळाडूंप्रमाणे विराट कोहली हा देखील रणजी ट्रॉफीत अपेक्षेप्रमाणे कमबॅक करण्यात अपयशी ठरला आहे. विराट अक्षरक्ष: ढेर झालाय. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येत असलेल्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी विराट कोहली क्लिन बोल्ड झाला. विराटला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. विराट 6 धावा करुन माघारी परतला. आता विराट फक्त आऊट झाला असता तर काय विषय नाय. मात्र विराट क्लिन बोल्ड झाला आणि स्टंप ज्या पद्धतीने उडत स्लीपमधील पहिल्या खेळाडूंपर्यंत गेला,ते विराटासाठी लाजिरवाणं आहे, असं म्हटल्यास चूक ठरणार नाही.

विराटने दशकभरानंतर रणजी ट्रॉफीत कमबॅक केलं. दिल्लीचा मुलगा दिल्लीत इतक्या वर्षांनंतर खेळतोय म्हटल्यावर दिल्लीकरांनी पहिल्या दिवसापासूनच स्टेडियममध्ये मोक्कार गर्दी केली. रेल्वेची पहिल्या डावात बॅटिंग होती. त्यामुळे विराटच्या बॅटिंगसाठी चाहत्यांना दुसर्‍या डावाची वाट पाहावी लागणार हे स्पष्ट होतं. रेल्वेचा डाव हा 241 धावांवर आटोपला. दिल्लीची काही विशेष सुरुवात होऊ शकली नाही. यश धुल आऊट झाल्याने दिल्लीची 2 बाद 78 स्थिती झाली.

विराटने ठरल्याप्रमाणे चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी मैदानात एन्ट्री घेतली. मैदानात विराट-विराट अशी घोषणाबाजी सुरु झाली. विराटने 1 चौकार ठोकला. विराटकडून आता अपेक्षा वाढल्या. विराट कमबॅकमध्ये शतक वगैरे करेल अशी आशा होती. पण कसलं काय, इथंही तिच तऱ्हा. रेल्वेच्या हिमांशु सांगवन याने दिल्लीच्या डावातील 28 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर विराटचा ऑफ स्टंप उंडवला. स्टंप 3-4 वेळा गोलांट्या घेत पहिल्या स्लीपच्या जवळपास गेला. विराट अशाप्रकारे आऊट झाला. विराटला आऊट केल्यानंतर हिमांशुने एकच जल्लोष केला. विराटने 15 बॉलमध्ये 1 फोरसह एकूण 6 धावा केल्या.

विराट कोहली क्लिन बोल्ड

रेल्वे प्लेइंग ईलेव्हन : सूरज आहुजा (कर्णधार), अंचित यादव, विवेक सिंग, उपेंद्र यादव (विकेटकीपर), मोहम्मद सैफ, भार्गव मेराई, कर्ण शर्मा, राहुल शर्मा, हिमांशू सांगवान, अयान चौधरी आणि कुणाल यादव.

दिल्ली प्लेइंग इलेव्हन : आयुष बडोनी (कर्णधार), अर्पित राणा, सनत सांगवान, विराट कोहली, यश धुल, प्रणव राजुवंशी (विकेटकीपर), सुमित माथूर, शिवम शर्मा, नवदीप सैनी, मनी ग्रेवाल आणि सिद्धांत शर्मा.

पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’
पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’.
'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी
'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी.
संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर
संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर.
डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध
डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध.
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा.
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल.
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ.
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?.
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार.
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं.