Shardul Thakur : W,W,W, शार्दूल ठाकुरची रणजीत हॅट्रिक, मेघालयची दुर्दशा
Shardul Thakur Hat Trick Video : मुंबईचा स्टार ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याने मेघालयविरुद्ध हॅटट्रिक घेतली आहे. शार्दूलच्या भेदक गोलंदाजाीमुळे मेघालयची घसरगुंडी झाली आहे.

पालघर एक्सप्रेस शार्दूल ठाकुर हा गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाासून दूर आहे. शार्दूलला गेल्या काही मालिकांमध्ये संधी देण्यात आली नाही. शार्दुलचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी समावेश करण्यात आला नाही. तसेच निवड समितीने शार्दूलला इंग्लंडविरुद्धच्या टी 20 आणि वनडे सीरिजसाठीही संधी दिली नाही. मात्र शार्दूलने यानंतरही देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी सुरु ठेवली आहे. शार्दूलने रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक झळकावलं होतं. शार्दूलने त्यानंतर आता मेघालयविरुद्धच्या करो या मरो सामन्यात हॅटट्रिक घेत धमाका केला आहे.
शार्दुलने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील सातव्या राउंडमध्ये मेघालयविरुद्ध खेळत आहे. हा सामना मुंबईतील बीकेसी शरद पवार अकादमीत खेळवण्यात येत आहे. मुंबईने टॉस जिंकून मेघालयला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शार्दुलने मेघायलला सामन्यातील पहिल्याच ओव्हरमधील चौथ्याच चेंडूवर पहिला झटका दिला. शार्दूलने निशांता चक्रवर्ती याला आऊट केलं. त्यानंतर शार्दुल मेघालयच्या डावातील तिसरी आणि त्याच्या कोट्यातील दुसरी ओव्हर टाकायला आला. शार्दुलने या ओव्हरमधील शेवटच्या 3 चेंडूवर सलग 3 विकेट्स घेत हॅटट्रिक पूर्ण केली.
शार्दुलची हॅटट्रिक, मेघालयची घसरगुंडी
शार्दूलने चौथ्या बॉलवर अनिरुद्ध बी याला आऊट केलं. अनिरुद्ध बोल्ड झाला. त्यानंतर सुमित कुमार कॅच आऊट झाला. शम्स मुलानी याने सुमितचा कॅच घेचला. त्यानंतर शार्दुलने ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर जसकीरतला क्लिन बोल्ड केलं. शार्दूलने अशाप्रकारे हॅटट्रिक घेतली. विशेष म्हणजे शार्दुलने या तिघांपैकी एकालाही भोपळा फोडू दिला नाही. शार्दुलने घेतलेल्या या हॅटट्रिकमुळे मेघालयची स्थिती 2 बाद 5 अशी झाली.
शार्दूलची उल्लेखनीय कामगिली,मेघालयविरुद्ध हॅटट्रिक
Balchander Anirudh ✅ Sumit Kumar ✅ Jaskirat Singh Sachdeva ✅
Shardul Thakur is on fire 🔥
He’s picked up a 𝗵𝗮𝘁-𝘁𝗿𝗶𝗰𝗸 to help Mumbai bowl out Meghalaya for 86 👌👌#RanjiTrophy | @imShard | @MumbaiCricAssoc | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/9ApJe0CgxG pic.twitter.com/B9azjgx1JB
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 30, 2025
मुंबई प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड, आकाश आनंद (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, शम्स मुलानी, अमोघ भटकळ, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, सिल्वेस्टर डिसूझा आणि मोहित अवस्थी.
मेघालय प्लेइंग इलेव्हन : आकाश चौधरी (कर्णधार), अर्पित सुभाष भटेवरा (विकेटकीपर), निशांत चक्रवर्ती, बालचंदर अनिरुद्ध, हिमन फुकन, सुमित कुमार, प्रिंगसंग संगमा, जसकीरत सिंग, अनिश चरक, किशन लिंगडोह आणि नफीस सिद्दीकी.