मुंबई : क्रिकेट विश्वात (Cricket News) मोठी घडामोड घडली आहे. टी 20 वर्ल्ड कपआधी (T 20 World Cup) कर्णधारपदावरुन (Captaincy) पायऊतार झालेल्या खेळाडूवर टीम मॅनेजमेंटने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. या खेळाडूने टी 20 वर्ल्ड कपच्या आधी संघ जाहीर झाल्यानंतर नाराज होत कर्णधारपद सोडलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा हा खेळाडू संघाचं नेतृत्व करणार आहे. टीम मॅनेजमेंटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. (rashid khan has replaced mohammad nabi as afghanAtalans captain for t20i format)
अफगाणिस्तानच्या (Afghanistan Cricket Team) कर्णधारपदी पुन्हा एकदा राशिद खानची (Rashid Khan) नियुक्ती करण्यात आली आहे. राशिदला याआधी 2021 च्या टी 20 वर्ल्ड कपआधी कर्णधारपद देण्यात आलं होतं. मात्र संघ जाहीर केल्यानंतर राशिदने कॅप्टन्सी सोडली होती. संघ निवडीबाबत मला विश्वासात घेतलं नव्हतं, असा आरोप राशिदने केला होता. त्यानंतर कर्णधारपदाची जबाबदारी ही मोहम्मद नबीला दिली होती. मात्र त्यानेही ऑस्ट्रेलियात झालेल्या 2022 च्या वर्ल्ड कपनंतर कॅप्टन्सीला रामराम ठोकला होता.
राशिदची अफगाणिस्तानच्या कर्णधारपदी फेरनियुक्ती
Meet Our T20I Captain ??@rashidkhan_19, Afghanistan’s Cricketing Wizard, has replaced @MohammadNabi007 as AfghanAtalan’s captain for the T20I format.
Read More ? https://t.co/fYUYXrjmxe pic.twitter.com/ZKz9IuVGtL
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 29, 2022
“राशिद खान खूप मोठं नाव आहे. तो अनुभवी आहे. टीमच्या प्रगतीसाठी त्याचा अनुभव नक्कीच फायदेशीर ठरेल. राशिदकडे वनडे, कसोटी आणि टी 20 अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये कॅप्टन्सीचा अनुभव आहे. आम्हाला राशिदची कर्णधारपदी फेरनियुक्ती करुन आम्हाला आनंदी आहोत”, असा विश्वास अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेयरमन मीरवाईज अशरफ यांनी व्यक्त केला.
“कर्णधारपद म्हणजे मोठी जबाबदारी आहे. मला नेतृत्वाचा याआधीही अनुभव होता. इथे बरेच चांगले खेळाडू आहेत. सर्वांसोबत माझे चांगली गट्टी आहे. आम्ही पुन्हा एकदा संघाला विजयपथावर आणण्यासाठी मेहनत करु आणि देशाचं नाव उंचावू”, अशी प्रतिक्रिया राशिदने दिली.