AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या विजयानंतर कॅप्टन राशिद ब्रायन लाराबाबत काय म्हणाला?
Rashid Khan Post Match Presenation: राशिद खान याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान क्रिकेट टीमने वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर कॅप्टन राशिद काय म्हणाला?
अफगाणिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. अफगाणिस्तानने बांगालदेशवर 8 धावांनी थरारक विजय मिळवत ऑस्ट्रेलियाचाही परतीचा प्रवासही निश्चित केला. पावसामुळे बांगलादेशला 19 ओव्हरमध्ये 114 धावांचं सुधारित आव्हान मिळालं होतं. मात्र कॅप्टन राशिद खान आणि नवीन उल हक या जोडीने 4-4 विकेट्स घेत बांगलादेशला 17.5 ओव्हरमध्ये 105 धावांवर ऑलआऊट केलं. या विजयानंतर अफगाणिस्तानमध्ये जंगी जल्लोष केला जात आहे. अफगाणिस्तानची ही सेमी फायनलमध्ये पोहचण्याची पहिली वेळ ठरली. तसेच आता अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध भिडणार आहे. अफगाणिस्तानच्या विजयानंतर कॅप्टन राशिदने आनंद व्यक्त केला. तसेच राशिदने ब्रायन लाराबाबतही प्रतिक्रिया दिली.
राशिद या विजयाबाबत भरभरुन बोलला. आमच्यासाठी हा विजय ऐतिहासिक आणि स्वप्नवत असल्याचं राशिदने म्हटलं. देशवासियांसाठी हा मोठा क्षण आहे. तसेच सेमी फायनलमचं आव्हान असणार आहे, असं राशिदने म्हटंल.
राशिद खान काय म्हणाला?
एक टीम म्हणून सेमी फायनलमध्ये पोहचणं आमच्यासाठी स्वप्नासारखे आहे. आम्ही ज्या पद्धतीने स्पर्धेला सुरुवात केली आहे त्याबद्दल हे सर्व आहे. आम्हाला न्यूझीलंडला हरवल्यानंतर हा विश्वास आला. माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. ब्रायन लारा हा एकमेव माणूस होता ज्याने आम्हाला सेमी फायनलमध्ये नेलं आणि आम्ही ते बरोबर सिद्ध केले. मी त्याला सांगितले की आम्ही तुला निराश करणार नाही”, असं राशिद म्हणाला.
“आम्हाला वाटलं की या विकेटवर 130-135 ही चांगली धावसंख्या आहे. आम्ही 15 ते 20 धावा कमी केल्या. बांगलादेश सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी 12 ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण करण्याच्या तयारीने येतील हे माहित होतं. आम्ही प्रयत्न केले, तेच आमच्या हातात होतं. सगळ्यांनी छान काम केलं. T20 मध्ये आमचा पाया मजबूत आहे, विशेषतः गोलंदाजीत. आमच्याकडे वेगवान गोलंदाजीचा दर्जा आहे, ते कुशल आहेत”, असं म्हणत राशिदने गोलंदाजांचं कौतुक केलं.
“आम्हाला 10 विकेट्स घ्यायच्या होत्या, उपांत्य फेरीत जाण्याचा हा एकमेव मार्ग होता, दुसरा कोणताही मार्ग नव्हता”, असंही राशिदने म्हटलं. तसेच राशिदने गुलबीन नईबच्या क्रॅम्पवरही प्रतिक्रिया दिली. “गुलबदिनला क्रॅम्प होतां. त्याने घेतलेली विकेट आमच्यासाठी खूप मोठी होती”, असं कॅप्टन म्हणाला.
हा विजय देशवासियांसाठी एक भव्य उत्सव आहे. मायदेशी परतताना देशाला खूप अभिमान वाटेल. उपांत्य फेरीत राहणे आता मोठे आव्हान आहे. आम्हाला गोष्टी सोप्या ठेवाव्या लागतील आणि आम्ही मोठ्या प्रसंगाचा आनंद घेत आहोत याची खात्री करावी लागेल”असं राशिद म्हणाला.
अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन : राशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, नांगेयालिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), तनझिद हसन, तौहिद ह्रदोय, शकिब अल हसन, महमुदुल्ला, सौम्या सरकार, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.