Rashid Khan याची वादळी खेळी ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचं कारण ठरणार?

Australia vs Afghanistan | अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. ऑस्ट्रेलियाचे अनुभवी गोलंदाज हे अफगाणिनस्तानसमोर निष्प्रभ ठरले.

Rashid Khan याची वादळी खेळी ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचं कारण ठरणार?
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 7:49 PM

मुंबई | राशिद खान याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अखेरच्या क्षणी बॅटिंगला येत 18 बॉलमध्ये नाबाद 35 धावांची खेळी केली. राशिद याने 35 पैकी 26 धावा या फक्त 5 बॉलमध्ये केल्या. राशिदने नाबाद 35 धावांच्या खेळीत 3 सिक्स आणि 2 चौकार ठोकले. राशिदने केलेल्या या फटकेबाजीमुळे अफगाणिस्तान चांगल्या स्थितीत पोहचली. तसेच इब्राहीम झद्रान याने शतक ठोकलं. इब्राहीमने अखेरपर्यंत मैदानात नाबाद राहत 129 धावांची शतकी खेळी केली.

राशिदच्या धावा ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचं कारण ठरणार?

राशिदने नॉट आऊट 35 रन्स केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला कांगांरुंसमोर 292 धावांचं आव्हान ठेवता आलं. राशिदने इब्राहीमसोबत एका बाजूने जोरदार फटकेबाजी करत ऑस्ट्रेलिया गोलंदाजांवर चांगला दबाव निर्माण केला. राशिदने याचाच फायदा घेत आणखी जोरदार बॅटिंग केली. आता राशिदची 35 धावांची खेळी ऑस्ट्रेलियाच्या पराभवाच्या कारण ठरते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.

शेवटच्या 10 ओव्हर निर्णायक

दरम्यान अफगाणिस्तान अखेरच्या 10 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरली. अफगाणिस्तानने अखेरच्या 10 ओव्हरमध्ये तब्बल 94 धावा केल्या. रशिद खान आणि अफगाणिस्तानचे इतर फलंदाज हे 10 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर तुटून पडले. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलिया कर्णधार-बॉलर पॅट कमिन्स यालाही झोडला. त्यामुळे कॅप्टनच दबावात गेल्याने टीमवरही दबाव तयार झाला. या दबावातूनच अफगाणिस्तानने 10 ओव्हरमध्ये 94 धावा करुन 291 धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानचा 291 ही वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

इब्राहीम झद्रान याचं शतक

दरम्यान इब्राहीम झद्रान याने शतक ठोकलं. इब्राहीम अफगाणिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा पहिलाच फलंदाज ठरला. इब्राहीमने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तानकडून सर्वाधिक नाबाद 129 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद आणि नवीन-उल-हक.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.