IND vs SA : कसोटीतील पराभवानंतर रवी शास्त्री या खेळाडूवर भडकले, ‘बारकं पोरगं नाही’ म्हणत रणजी खेळण्याचा सल्ला

Ravi Shastri on ind vs sa first test match : टीम इंडियाचा पहिल्या कसोटी सामन्यात आफ्रिकेविरूद्ध झालेला पराभव सर्वांच्या जिव्हारी लागला आहे. आफ्रिकेने डावाने विजय मिळवल्याने टीम इंडियाचा मोठा पराभव झाला आहे. या पराभवानंतर रवी शास्त्री यांनी एका खेळाडूल झापलं आहे.

IND vs SA : कसोटीतील पराभवानंतर रवी शास्त्री या खेळाडूवर भडकले, 'बारकं पोरगं नाही' म्हणत रणजी खेळण्याचा सल्ला
Ravi Shatri on Shardul Thackurfirst test match
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 4:55 PM

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी मोठा पराभव झाला. आफ्रिकेला त्यांच्याच भूमिकेत पराभूत करण्याचं स्वप्न आणखी एकदा अधूर राहिलं आहे. या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. त्यासोबतच गोलंदाजांनीही म्हणावी अशी धार दाखवली नाही, याचा परिणाम असा झाला की टीम इंडियाचा फक्त पराभवच नाही झाला तर डावाने आफ्रिकेने विजय मिळवला. या पराभवानंतर टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री  एका खेळाडूवर चांगलेच भडकले आहेत.

काय म्हणाले रवी शास्त्री?

टीम इंडियाच्या गोलंदाजीमध्ये अनुभवाची कमतरता दिसून आली. सुरूवीताच्या स्पेलमध्ये मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी चांगला दबाव निर्माण केला होता. मात्र तिसऱ्या गोलंदाजाची कमी पडली. शार्दूल ठाकूर हा बारिक पोरगा नाही तो चौथा फास्टर आहे. परदेशात खेळताना तुमच्या संघात तिसरा फास्टर असणं गरजेचं आहे कारण त्यामुळे मोठा फरक पडत असल्याचं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

रवी शास्त्री यांच्यासोबत चर्चा करत असताना मार्क निकोल्सने अर्शदीप सिंह याचं नाव घेतलं. यावर बोलताना, अर्शदीपने जोहान्सबर्गमध्ये पाच विकेट त्यानंतर पार्लमध्ये चार विकेट घेतल्या होत्या. त्याच्याकडे डाव्या हाताने चेंडू टाकण्याचं चांगलं कौशल्य आहे मात्र कसोटी क्रिकेटसाठी तो तयार आहे का? असा सवाल शास्त्री यांनी केला. अर्शदीप याने घरगुती क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त रणजी क्रिकेट आणि प्रथम श्रेणीचे सामने खेळायला हवेत असा सल्लाही शास्त्री यांनी दिला.

दरम्यान, शेवटच्या म्हणजेच दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये मोहम्मद शमी याच्या जागी बदली खेळाडू म्हणून आवेश खान याची निवड करण्यात आली आहे. आवेश खान याने वन डे सामन्यांमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्याची निवड करण्यात आली असावी. आवेश खान याला दुसऱ्या कसोटीमध्ये संधी मिळते की मुकेश कुमार याची निवड केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध्द कृष्णा, केएस भरत (WK), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.