IND vs SA : आफ्रिकेविरूद्धची मालिका सुरू होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का
IND vs SA : टीम इंडियासाठी काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. दौऱ्याला सुरूवात होण्याआधीच दोन हुकमी खेळाडूंबाबत मोठी अपडेट आलीय. टी-20 मालिकेला अवघे दोन दिवस बाकी असल्याने मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी डर्बनमध्ये 6 डिसेंबरला पोहोचली आहे. वन डे, टी- 20 आणि कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेला दोन दिवसांनी सुरूवात होणार असून टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. मात्र त्याआधी काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू अजुनही आफ्रिकेमध्ये पोहोचले नाहीत. दोन दिवसांवर सामना आला असताना खेळाडूनेच नसल्याने टीम इंडियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहेत.
कोण आहेत ते खेळाडू?
वन डे मालिकेमध्ये टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी दिलेला रविंद्र जडेजा आहे. दुसरा खेळाडू शुबमन गिल असून दोघे अजुनही आफ्रिकेमध्ये पोहोचले नाहीत. दोन्ही खेळाडू सध्या यूरोपमध्ये असून ते थेट संघासोबत जोडले जाणार आहेत. वन डे मालिका नंतर आहे मात्र टी-२० मालिका 10 तारखेपासून सुरू होणार आहे. शुबमन गिल याचा टी-20 संघात समावेश केला आहे.
टी-20 वर्ल्ड कप आता काही महिन्यांवर आला असून त्यासाठी युवा खेळाडूंना हा मालिका सुवर्णसंधी आहे. या मालिकेमध्ये खास करून रिंकू सिंग, रवी बिश्नोई, तिलक वर्मा या खेळाडूंकडे लक्ष असणार आहे. ऑस्ट्रेलियाला नमवल्यावर सूर्यासाठी कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेमधील पहिली मालिका असणार आहे.
बीसीसीआयने जाहीर केलेले संघ
2 कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (c), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (wk), केएल राहुल (wk), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी*, जसप्रीत बुमराह (vc), प्रसीध कृष्णा.
3 वनडेसाठी भारताचा संघ: रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (C&W), संजू सॅमसन (wk), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.
3 टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (wk), जितेश शर्मा (wk), रवींद्र जडेजा (vc), वॉशिंग्टन सन , रवी बिश्नोई , कुलदीप यादव , अर्शदीप सिंग , मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर