IND vs PAK : भारताने पाकिस्तानला हरवलंच, जड्डूने रचलेल्या विक्रमाची कोणालाच नाही खबर

Ravindra Jadeja 100 Wkt ODI Cricket : भारताचा स्टार खेळाडू रविंद्र जडेजा याने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात जडेजाने 2 विकेट घेत मोठा विक्रम आपल्या नावार केला आहे.

IND vs PAK : भारताने पाकिस्तानला हरवलंच, जड्डूने रचलेल्या विक्रमाची कोणालाच नाही खबर
रवींद्र जडेजा याने टीम इंडियासाठी बॅटिंग आणि बॉलिंगने दुहेरी जबाबदारी बजावली आहे. न्यूझीलंड विरुद्धही जडेजाने अष्टपैलू कामगिरी करावी, अशीच आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.
Follow us
| Updated on: Oct 16, 2023 | 12:29 AM

मुंबई : वर्ल्डकप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघामध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी करताना 191 धावांवर ऑल आऊट झाला. पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा ढासळला, अवघ्या 36 धावांमध्ये 8 विकेट्स गेल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्मा याची 80 धावांची तुफानी अर्धशतकाच्या जोरावर भारताने सात विकेटने विजय मिळवला. पाकिस्तानला पराभूत करणं मोठी गोष्ट होती, सर्वच गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं होतं. सगळ्यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या यामधील सर जडेजाने घेतलेल्या दोन विकेटने मोठा विक्रम रचला गेला आहे.

सर जडेजाने कोणता विक्रम केलाय

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात जडेजाने दोन विकेट घेतल्या होत्या. या दोन विकेटसह त्याने वन डे मध्ये 100 विकेट घेतल्या आहेत. वन डे मध्ये अशी कामगिरी करणारा ते पहिला डावखुरा गोलंदाज ठरला आहे. झहीर खान याला त्याने मागे टाकलं आहे. झहीरने वन डे क्रिकेटमध्ये 94 विकेट घेतल्या आहेत.

वर्ल्ड कपमधील हायव्होल्टेज सामना सर्वांना वाटलं रोमहर्षक होईल मात्र तसं काही झालं नाही. रोहित शर्मा अँड कंपनीने मात्र पाकिस्तान संघाची डाळ काही शिजू दिली नाही. सर्व गोलंदाजांनी कडक गोलंदाजी केली. त्यानंतर रोहितने तर वन साईड सामना मारला.

दरम्यान, भारताने या विजयासह वर्ल्ड कपमधील आपला तिसरा विजय मिळवला. या विजयासह भारताने आपलं वर्ल्ड कपमधील वर्चस्व कायम ठेवलं, भारताने पाकिस्तान संघाला आठवेळा पराभूत केलं आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.