IND vs ENG | दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला मजबूत धक्का!
India vs England Test Series | इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया मुख्य खेळाडू नसल्याने आधीच अडचणीत आहे. त्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. कॅप्टन रोहित शर्माचं टेन्शन दुप्पटीने वाढलंय.
मुंबई | टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 2 फेब्रुवारी रोजी दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. त्याआधीच टीम इंडियाच्या असलेल्या अडचणीत आणखी वाढ करणारी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे काही खेळाडू हे आधीच या मालिकेत नाहीत. काहींना दुखापतीमुळे खेळता येत नाहीये. तर काहींनी वैयक्तिक कारणामुळे माघार घेतलीय. याचाच परिणाम म्हणून पहिल्या कसोटीत युवा खेळाडूंना खेळवावं लागलं. परिणामी पराभवाचा सामना करावा लागला.
आधीच अनुभवी खेळाडू नसल्याने टेन्शन वाढलंय. त्यात आता आणखी भर पडली आहे. मोहम्मद शमी हा पहिल्या 2 कसोटीचा भाग नाही. विराटने 2 सामन्यातून माघार घेतलीय. केएल आणि रवींद्र जडेजा हे दोघेही दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. जडेजाला हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळता येणार नाहीये. त्यामुळे जडेजा दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी एनसीएत गेलाय. तर केएल राहुलही जाणार आहे. आता त्यानंतर मोठी अपडेट समोर आली आहे.
रिपोर्ट्सनुसार, रवींद्र जडेजा राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीलाही मुकू शकतो. रवींद्र जडेजाचं कमबॅक हे अशक्य असल्याचं म्हटलं जात आहे. जडेजाला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरण्यासाठी जडेजाला 4 ते 8 आठवड्यांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे 15 फेब्रुवारीपासून होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतही जडेजा खेळू शकत नाही. मात्र सध्या बीसीसीआयने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार जडेजा दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही. तर विराट कोहली याच्याबाबत अजून कोणतीही अपडेट नाही.
विराट कोहलीचं काय?
विराट पहिल्या 2 कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नसल्याने त्याच्या जागी रजत पाटीदार याला संधी देण्यात आली. विराटने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली. मात्र त्यानंतर आता विराट तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबतही अधिकृत माहिती नाही. या दरम्यान विराटच्या आईची तब्येत स्थिर नसल्याची चर्चा रंगली. मात्र विराटच्या भावाने हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं.
टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर),रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स एंडरसन.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.