राजकोट | इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर राहिला. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 86 ओव्हरमध्ये 326 धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव ही जोडी नाबाद परतली. कॅप्टन रोहित शर्मा, जडेजा आणि डेब्यूटंट सरफराज खान या तिघांनी पहिला दिवस गाजवला. टीम इंडियाकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 131 धावांची खेळी केली. रवींद्र जडेजा 110 आणि कुलदीप यादव 1 धावेवर नाबाद परतला. तर सरफराज दुर्देवी ठरला. सरफराज रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे 62 धावांवर रन आऊट झाला. धमाकेदार खेळी करत असलेला सरफराज रन आऊट झाल्याने नेटकऱ्यांनी जडेजावर सोशल मीडियावरुन टीका केली. त्यानंतर जडेजाने सरफराजची जाहीर माफी मागितली आहे.
जेम्स एंडरनस सामन्यातील पहिल्या डावातील 82 वी ओव्हर टाकत होता. रवींद्र जडेजा शतकापासून काही धावा दूर होता. जडेजाने 90 धावांचा टप्पा पार केल्यानंतर सावधपणे खेळत होता. आता जडेजाला शतक ठोकण्याची घाई झाली होती. जडेजाच्या या घाईचा शिकार शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा सरफराज झाला.
जडेजाने एंडरसनच्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर फटका मारुन सरफराजला सिंगलसाठी कॉल दिला. सरफराज कॉल मिळताच धावला. तर स्ट्राईक एंडवरच्या जडेजाने बॉल मार्क वूड याच्या जवळ जातोय हे पाहताच 2 पावलं धावल्यानंतर घूमजाव केला आणि सरफराजला परत पाठवलं. पण तोवर सरफराज बराच पुढे आलेला. सरफराज मागे जाण्याआधीच मार्क वूडने डायरेक्ट थ्रो केला. सरफराजच्या या खेळीचा अशाप्रकारे दुर्देवी अंत झाला.
सरफराज असा रन आऊट झाला
Jadeja was too mean to betray a debutant. @ImRo45 was also unhappy with Selfish @imjadeja.
Well played Sarfaraz. 👏👐.#SarfarazKhan | #INDvENG | #Jadeja
pic.twitter.com/KDYpS4mZRY— Mukhalifeen E Majlis (Parody) (@shh_ji20) February 15, 2024
Ravindra Jadeja’s Instagram story. pic.twitter.com/IPbammFJic
— Johns. (@CricCrazyJohns) February 15, 2024
सरफराजला रन आऊट केल्यांनतर नेटकऱ्यांनी जडेजावर टीकेची झोड उठवली. सामना संपल्यानंतर कदाचित जडेजाला आपली चूक लक्षात आली असावी. त्यामुळे जडेजाने इंस्टा स्टोरीवर सरफराजची मेन्शन करत माफी मागावी लागली. “मला सरफराज खानसाठी वाईट वाटतंय. माझा चुकीचा कॉल होता. चांगला खेळलास”, असं जडेजाने इंस्टा स्टोरीमध्ये म्हटलंय.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.