IND vs SL Final | Ravindra Jadeja याचा नेत्रदीपक कॅच, पाथुम निसांका पाहतच राहिला, VIDEO
Ravindra Jadeja Pathum Nissanka Catch Asia Cup 2023 Final | टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा हा त्याच्या अफलातून फिल्डिंगसाठी ओळखला जातो. जडेजाने त्याच्या या फिल्डिंगचा नजारा दाखवून दिलाय.
कोलंबो | आशिया कप 2023 फायनल सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना तब्बल 40 मिनिटांच्या विलंबाने सुरु झाला. सामन्याला 3 वाजून 40 मिनिटांनी सुरुवात झाली. श्रीलंकेकडून पाथुम निसांका आणि कुसल परेरा ही सलामी जोडी मैदानात आली. टीम इंडियाने पहिल्याच ओव्हरमध्ये ही जोडी फोडली. टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने कुसल परेरा याला झिरोवरच आऊट केलं. बुमराहने कुसलला विकेटकीपरच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर सामन्याती तिसऱ्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेला दुसरा झटका दिला.
रवींद्र जडेजाची तुफान कॅच
श्रीलंकेच्या डावातील चौथी ओव्हर मोहम्मद सिराज टाकायला आला. सिराजच्या या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर श्रीलंकेने दुसरी विकेट गमावली. पाथुमने पॉईंटच्या दिशेने फटका मारला. तिथे टीम इंडियाचा रवींद्र जडेजा होता. जडेजाने बॉल अचूक जज केला. हवेत उडी घेतली आणि अफलातून कॅच टिपला.जडेजाने घेतलेल्या कॅचमुळे पाथुम निसांकाही पाहत राहिला.
जडेजाचा सुपर कॅच
What a catch by Jadeja! You just expect this from him. #AsiaCup23 #AsiaCupFinals #jadeja #INDvSL pic.twitter.com/BgibBXy81n
— Shivam Saini (@itsshivamsaini) September 17, 2023
आशिया कप 2023 फायनलसाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली. केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
आशिया कप फायनलसाठी श्रीलंकेचे 11 शिलेदार | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन आणि मथीशा पाथिराना.