IND vs SL T-20: रवींद्र जाडेजाच्या पहिल्या तीन चेंडूंवर 6,4,6 त्यानंतर पुढच्या चेंडूवर असा केला पलटवार

| Updated on: Feb 26, 2022 | 10:06 PM

भारत आणि श्रीलंकेमध्ये (India vs Srilanka) आज दुसरा टी 20 सामना सुरु आहे. कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

IND vs SL T-20: रवींद्र जाडेजाच्या पहिल्या तीन चेंडूंवर 6,4,6 त्यानंतर पुढच्या चेंडूवर असा केला पलटवार
Image Credit source: PTI
Follow us on

नवी दिल्ली: भारत आणि श्रीलंकेमध्ये (India vs Srilanka) आज दुसरा टी 20 सामना सुरु आहे. कर्णधार रोहित शर्माने (Rohit sharma) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण गोलंदाजांना हा निर्णय सार्थ ठरवता आला नाही. शेवटच्या चार षटकात श्रीलंकेच्या निसांका-शानका जोडीने तुफान फटकेबाजी केली. त्यांनी चार षटकात 72 धावा चोपल्या. त्यामुळे निर्धारीत 20 षटकात श्रीलंकेने पाच बाद 183 धावांचा डोंगर उभा केला. सुरुवातीची पाच षटकं श्रीलंकेने सावध फलंदाजी केली. पण त्यानंतर फटकेबाजी सुरु केली. त्यांनी भारताचा डावखुरा गोलंदाज रवींद्र जाडेजावर (Ravindra jadeja) जोरदार हल्लाबोल केला. जाडेजाच्या गोलंदाजीवर पथुम निसांका आणि दानुष्का गुणतिलकाने जोरदार प्रहार केला. पण अखेर जाडेजाचा विजय झाला. निसांका-गुणतिलका जोडीने पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. रवींद्र जाडेजाने पहिले यश मिळवून दिले.

नेमकं काय झालं?

श्रीलंकेच्या डावातील नवव्या षटकात रवींद्र जाडेजा गोलंदाजीसाठी आला. समोर दानुष्का गुणतिलका फलंदाजी करत होता. रवींद्र जाडेजाच्या पहिल्याच चेंडूवर गुणतिलकाने षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या बॉलवर पुन्हा षटकार ठोकला. जाडेजाच्या या षटकात अशीच चौकार-षटकारांची बरसात सुरु राहणार, असं वाटत होतं. पण षटकाच्या चौथ्या चेंडूवर रवींद्र जाडेजाने पलटवार केला.

चौथ्या चेंडूवर दानुष्का गुणतिलकाने चौकार फटकावण्याच्या प्रयत्नात हवेमध्ये फटका खेळला. वेंकटेशन अय्यरने धावत जाऊन शानदार कॅच पकडला. अशा प्रकारे जाडेजाने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्याने 29 चेंडूत त्याने 38 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले.