मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये खेळणारा आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू हर्षल पटेलच्या (Harshal Patel) बहिणीचे निधन झाले आहे. 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) सामना खेळत असताना त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सामना संपल्यानंतर हर्षल एका दिवसासाठी घरी परतला आहे. आता तो सीएसकेविरुद्ध (CSK) 12 एप्रिलला होणाऱ्या सामन्यापूर्वी संघात सामील होण्याची शक्यता आहे. मात्र, तो परतल्यानंतर क्वारंटाइन सिस्टिम कशी असेल, हे सध्या अद्याप स्पष्ट झालेले नाही. हर्षल पटेल गेल्या दोन वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी स्टार परफॉर्मर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यातही त्याने 2 बळी घेतले होते.
आरसीबीने शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबईवर 7 विकेटने विजय मिळवला. या विजयात हर्षलने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आयपीएलशी संबंधित सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, “हर्षलचे अचानक बायो बबलमधून बाहेर पडणे दुर्दैवी आहे. कारण त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचे निधन झाले आहे. 12 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यापूर्वी हर्षल संघाच्या बायो बबलमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.” हर्षलच्या कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाला हे पीटीआयने स्पष्ट केलेले नाही. मात्र दैनिक जागरणच्या वृत्तानुसार हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन झालं आहे.
आयपीएल 2022 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत आणि एक सामना गमावला आहे. रॉयल चॅलेंजर्सच्या कामगिरीत हर्षल पटेलचा मोठा वाटा आहे. हर्षलने गेल्या वर्षी पर्पल कॅप पटकावली होती. आरसीबीला मंगळवारी चेन्नई सुपर किंग्जसोबत सामना खेळायचा आहे. हर्षल पटेल या सामन्यापूर्वी सघात सामील होईल पण त्यात खेळू शकेल की नाही, हे सध्या सांगता येणार नाही.
इतर बातम्या
RCB vs MI, IPL 2022 : सूर्यकुमारने एकट्याने RCBला शांत केलं, अर्धशतक ठोकले
Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने मैदानात उतरताच केला मोठा विक्रम, धोनी आणि रैनाच्या यादीत समावेश