IPL 2023 | आयपीएल 2024 आधी RCB चा मोठा निर्णय, थेट कोच बदलला
Head Coach | क्रिकेट टीमने मोठा निर्णय घेतला आहे. हेड कोच म्हणून दिग्गज खेळाडूची नियुक्ती केली आहे.
मुंबई | आयपीएल 17 व्या मोसमाला (IPL 2024) अजून बरेच महिने बाकी आहेत. त्याआधी आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहली आणि चाहत्यांसाठी गूड न्युज आहे. आरसीबी टीम मॅनेजमेंटने झिंबाब्वेचे माजी दिग्गज क्रिकेटर एंडी फ्लॉवर यांची कोच म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता कोच बदलल्यानंतरही आसीबी आयपीएल ट्रॉफी जिंकणार का, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांकडून विचारला जात आहे. आरसीबीला आयपीएलच्या 16 मोसमात एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
आरसीबीचे उपाध्यक्ष आणि प्रमुख राजेश मेनन यांनी लंडनमध्ये फ्लॉवर यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर मेनन यांनी फ्लॉवर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
एंडी फ्लॉवर आरसीबीचे हेड कोच
We are beyond thrilled to welcome ??? ???? ?? ????? and ??? ????? ??? winning coach ???? ?????? as the ???? ????? of RCB Men’s team. ??
Andy’s experience of coaching IPL & T20 teams around the world, and leading his teams to titles… pic.twitter.com/WsMYGCkcYT
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) August 4, 2023
आरसीबी क्रिकेट डायरेक्टर माईक हेसन आणि हेडर कोच संजय बांगर यांचा कार्यकाळ संपलेला. मात्र या दोघांचा कार्यकाळ वाढवण्यात आला नाही. त्यामुळे बांगर आणि हेसन यांचेही आरसीबीसोबत असलेले संबंध ‘ऑलआऊट’ झाले आहेत.
फ्लॉवर यांची पहिली प्रतिक्रिया
“मला आरसीबी कुटुंबात सामील झाल्याचा अभिमान आहे. माईक हेसन आणि संजय बांगर या दोघांनी फार मेहनत घेतली. आता मी आरसीबीला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन”, अशी प्रतिक्रिया फ्लॉवर यांनी दिली.
कोचिंगचा प्रदीर्घ अनुभव
फ्लॉवर यांना कोचिंग पदीर्घ असा अनेक वर्षांचा अनुभव आहे. फ्लॉवर यांनी पीएसएल, द हंड्रेड, आयएलटी, टी 10 यासारख्या स्पर्धांमध्ये प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे.
इंग्लंड क्रिकेट टीमचेही ते कोच राहिले आहेत. फ्लॉवर यांच्या कोचिंगमध्ये इंग्लंडने 2010 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकली.
एंडी फ्लॉवर यांची क्रिकेट कारकीर्द
एंडी फ्लॉवर यांनी झिंबाब्वेचं 63 कसोटी सामन्यांमध्ये 12 शतकांसह 4 हजार 794 धावा केल्या आहेत. तसेच 213 एकदिवसीय सामन्यांमध्ये फ्लॉवर यांच्या नावावर 6 हजार 786 धावांची नोंद आहे. खेळाडू म्हणून क्रिकेटला रामराम केल्यानंतर एंडी कोचिंगमध्ये धमाका करत आहेत.