RCB vs DC IPL 2023 Highlight | दिल्लीचा बंगळुरुवर दणदणीत विजय, स्पर्धेत केलं कमबॅक

| Updated on: May 06, 2023 | 11:05 PM

RCB vs DC IPL 2023 Highlight : दिल्लीनं बंगळुरुला 7 गडी राखून पराभूत केलं. या विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.

RCB vs DC IPL 2023 Highlight | दिल्लीचा बंगळुरुवर दणदणीत विजय, स्पर्धेत केलं कमबॅक
RCB vs DC IPL 2023 Live Score : बंगळुरु विरुद्ध दिल्ली आमनेसामने, कोण मारणार बाजी?

मुंबई : आयपीएल 2023 चा 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. हा सामना बंगळुरुने 7 गडी राखून जिंकला. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्लेऑफचं गणित आणखी कठीण झालं आहे. बंगळुरुने 20 षटकात 4 गडी गमवून 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीने हे आव्हान 16.4 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह दिल्लीने स्पर्धेत जबरदस्त कमबॅक केलं आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 06 May 2023 10:58 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : दिल्लीचा डाव

    बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या 182 धावांचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि डेविड वॉर्नरने आक्रमक खेळी केली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 60 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या मिशेल मार्शनेही आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्याने 17 चेंडूत 26 धावा केल्या. पण हर्षल पटेलच्या गोलंदाजीव चुकीचा फटका मारताना बाद झाला. मात्र सॉल्टने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्याला रिली रोसोची चांगली साथ लाभली. त्यांनी षटकार आणि चौकाराची आतषबाजी केली. त्यामुळे चेंडू जास्त आणि धावा कमी अशी स्थिती झाली.

    फिल सॉल्टने 45 चेंडूत 87 धावा केल्या. या खेळीत 6 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश आहे. अवघ्या 11 धावा आवश्यक असताना अक्षर पटेल आला आणि पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.

  • 06 May 2023 10:51 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : सॉल्ट 87 धावा करून बाद

  • 06 May 2023 10:41 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : सॉल्ट आणि रिलेची जोरदार फटकेबाजी

  • 06 May 2023 10:28 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : मिशेल मार्श बाद

  • 06 May 2023 10:18 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : फिल सॉल्टचं दमदार अर्धशतक

  • 06 May 2023 09:52 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : मोहम्मद सिराज आणि फिल सॉल्टमध्ये जुंपली

    एकाच षटकात फिल सॉल्टने ठोकले सलग दोन षटकार आणि एक चौकार

  • 06 May 2023 09:33 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score | वॉर्नर आणि सॉल्ट मैदानात, दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात

    दिल्ली कॅपिट्ल्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि फिलीप सॉल्ट ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. आरसीबीने दिल्लीला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं आहे.

  • 06 May 2023 09:14 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : बंगळुरुचा डाव

    बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फाफ आणि विराट कोहलीने सावध सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 82 धावांची भागीदारी केली. मात्र मिशेल मार्शच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने त्याचा झेल घेतला आणि तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल आपलं खातंही खोलू शकला नाही. मिशेल मार्शने त्याला पहिल्या चेंडूवर तंबूत परत पाठवलं.

    दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर विराट आणि महिपाल लोमरोर यांनी डाव सावरला. दोघांनी 55 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीला मुकेश कुमारने तंबूचा रस्ता दाखवला. खलील अहमदने त्याचा झेल घेतला. त्याने 46 चेंडूत 55 धावांची खेळी केली.

    महिपाल लोमरोरनं आयपीएलमधलं पहिलं अर्धशतक ठोकलं. त्याने 26 चेंडूत 52 धावा केल्या. त्यानंतर दिनेश कार्तिकने 9 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर अनुज रावतने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.

  • 06 May 2023 09:07 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : महिपाल लोमरोरनं ठोकलं अर्धशतक

    महिपाल लोमरोरनं आयपीएलमधलं पहिलं अर्धशतक ठोकलं. त्याने 26 चेंडूत 52 धावा केल्या.

  • 06 May 2023 08:48 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : विराट 55 धावा करून बाद

    मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर विराट कोहली बाद झाला. खलील अहमदने त्याचा झेल घेतला.

  • 06 May 2023 08:40 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : विराटचं अर्धशतक

    विराट कोहलीने 42 चेंडूत ठोकलं अर्धशतक

  • 06 May 2023 08:21 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : मिशेल मार्शचे बंगळुरुला दोन धक्के

    फाफ डुप्लेसिस नंतर ग्लेन मॅक्सवेल शून्यावर बाद

  • 06 May 2023 08:06 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : फाफ आणि विराट कोहलीची अर्धशतकी भागीदारी

  • 06 May 2023 07:51 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : पाच षटकात बंगळुरुच्या बिनबाद 36 धावा

    एका षटकात फाफने तीन चौकार ठोकले.

  • 06 May 2023 07:32 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : विराट कोहलीची चौकाराने सुरुवात

  • 06 May 2023 07:09 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन

    दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद

  • 06 May 2023 07:08 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : आरबीची प्लेइंग इलेव्हन

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), केदार जाधव, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड

  • 06 May 2023 07:01 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : बंगळुरुने जिंकली नाणेफेक, प्रथम फलंदाजी

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

  • 06 May 2023 05:17 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : आरसीबीचा संपू्र्ण संघ

    बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, केदार जाधव, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.

  • 06 May 2023 05:17 PM (IST)

    RCB vs DC IPL 2023 Live Score Update : दिल्लीचा संपूर्ण संघ

    दिल्लीचा पूर्ण स्क्वॉड : ऋषभ पंत, डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमॅन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विक्की ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नॉर्खिया, चेतन सकारिया, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, मुस्तिफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे, रिली रूसो.

Published On - May 06,2023 5:14 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.