RCB vs GT IPL 2023 Score : गुजरातचा आरसीबीवर सणसणाटी विजय, विराटची शतकी खेळी व्यर्थ
RCB vs GT IPL 2023 Score Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरातने 6 विकेट्सने विजय मिळवला. गुजरातच्या विजयासह आरसीबी प्ले-ऑफमधून बाहेर झाला असून चौथ्या स्थानी मुंबई इंडिअन्स संघ असून अंतिम चारमध्ये त्यांनी समावेश केला आहे.
मुंबई : IPL 2023 चा शेवटचा म्हणजेच 70 वा लीग सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये गुजरातने 6 विकेट्सने विजय मिळवला. हा सामना हरल्याने आरसीबीचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्नही भंगले. या पराभवानंतर आरसीबीचा विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 198 धावांचा पाठलाग करताना गुजरातचा फलंदाज शुभमन गिलने नाबाद खेळी खेळली.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 5 गडी गमावून 197 धावा केल्या. संघासाठी, विराट कोहलीने 61 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 101 धावांचे शतक झळकावले. मात्र, शुभमन गिलच्या शतकाने कोहलीच्या नाबाद शतकाची छाया पडली. धावांचा पाठलाग करताना गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलने 52 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 104 धावा करून सामना जिंकला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.
गुजरात टायटन्स – शुभमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, दासून शनाका, राहुल तेवाटिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद.
LIVE Cricket Score & Updates
-
RCB vs GT : विजय शंकर बाद आऊट
अर्धशतकी खेळीनंतर विजय शंकर बाद झाला. त्याने 35 चेंडूंचा सामना करत 53 धावा केल्या. शंकरला विजयकुमारने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. गुजरातने 14.5 षटकात 148 धावा केल्या आहेत.
-
RCB vs GT : शुबमन गिलचं अर्धशतक
शुबमन गिलने शानदार कामगिरी करताना अर्धशतक झळकावले. 29 चेंडूत 50 धावा केल्यानंतर तो खेळत आहे. गिलने 5 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. गुजरातने 11.2 षटकात 105 धावा केल्या आहेत. संघाला विजयासाठी 52 चेंडूत 93 धावांची गरज आहे.
-
-
RCB vs GT Live Score : गिल-शंकरने सावरलं
गुजरातने 9 षटकांत एक विकेट गमावून 84 धावा केल्या. संघाला विजयासाठी 66 चेंडूत 114 धावांची गरज आहे. शुभमन गिल 40 धावा करून खेळत आहे. विजय शंकर 21 धावा करून क्रीजवर उभा आहे. या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली आहे.
-
RCB vs GT Live Sore : पार्नेलने घेतला जबरदस्त कॅच
गुजरात टायटन्सची पहिली विकेट पडली. ऋद्धिमान साहा 14 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. गुजरातने 3 षटकांत 25 धावा केल्या आहेत.
-
आरसीबीचं गुजरातला 198 धावांचं ‘विराट’ आव्हान, कोहलीची शतकी खेळी
या सामन्यामध्ये स्टार खेळाडू विराट कोहली याने शानदार शतक ठोकलं आहे. आरसीबीने गुजरातला 198 धावांचं लक्ष्य दिलं आहे. यामध्ये कोहलीचं शतक महत्त्वाचं ठरलं, विराट 101 धावांसह शेवटपर्यंत नाबाद राहिला.
-
-
RCB vs GT : विराटची जोरदार फटकेबाजी
आरसीबीने 17 षटकांत 5 गडी गमावून 155 धावा केल्या. विराट कोहली 51 चेंडूत 77 धावा केल्यानंतर खेळत आहे. अनुज रावतने 51 धावा केल्या आहेत. या दोघांमध्ये 22 धावांची भागीदारी आहे.
-
RCB vs GT : दिनेश कार्तिक आऊट
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मोठा धक्का बसला आहे. दिनेश कार्तिक पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता बाद झाला. यश दयालने दिनेश कार्तिकला आपला बळी बनवले. सध्या 15 षटकांनंतर फाफ डू प्लेसिसच्या संघाची धावसंख्या 5 बाद 136 अशी आहे.
-
RCB vs GT : मायकेल ब्रेसवेल आऊट
मायकेल ब्रेसवेल 16 चेंडूत 26 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोहम्मद शमीने मायकल ब्रेसवेलला आपला शिकार बनवले. आरसीबीची धावसंख्या 14 षटकांत 4 बाद 132 अशी आहे.
-
RCB vs GT : विराट कोहलीचं अर्धशतक
किंग विराट कोहली यांने आपलं 35 चेंडूत 51 धावा करत अर्धशतक केलं आहे. यंदाच्या पर्वातील विराट कोहली याचं हे सातवं अर्धशतक आहे. परंतु विराटला मोठी खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत संघाला पोहोचवायचं आव्हान असणार आहे.
-
RCB vs GT : 10 ओव्हरमध्ये आरसीबीच्या 93 धावा
आरसीबीने 10 षटकांत 3 गडी गमावून 93 धावा केल्या. विराट कोहली 48 धावा करून खेळत आहे. तो पन्नाशीच्या जवळ आहे. मायकेल ब्रेसवेल 1 धावा करून खेळत आहे.
-
RCB vs GT : महिपाल लोमरर आऊट
आरसीबीची तिसरी विकेट पडली. महिपाल लोमरर अवघी 1 धावा करून बाद झाला. आरसीबीने 9.1 षटकात 85 धावा केल्या आहेत. गुजरातची दुसरी विकेट नूर अहमदला मिळाली.
-
RCB vs GT : ग्लेन मॅक्सवेल बोल्ड
आरसीबीची दुसरी विकेट ग्लेन मॅक्सवेलच्या रूपाने पडली. ग्लेन मॅक्सवेल 11 धावा करून बाद झाला. त्याला राशिद खानने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आरसीबीने 8.2 षटकात 80 धावा केल्या आहेत.
-
RCB vs GT : आरसीबीला पहिला धक्का
आरसीबीला पहिला धक्का बसला असून फाफ डू प्लेसिस 28 धावा करून बाद झाला. त्याला नूर अहमदने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आरसीबीने 7.1 षटकात 67 धावा केल्या आहेत. विराट कोहली 38 धावा करून खेळत आहे.
-
RCB vs GT Live Score : आरसीबची पॉवर प्लेमध्ये जबरदस्त बॅटींग
आरसीबीने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फटकेबाजी केली आहे. 6 ओव्हरमध्ये बिनबाद 62 धावा केल्या आहेत. यामध्येकोहलीने 22 चेंडूत 36 धावा तर फाफ डू प्लेसिसने 14 चेंडूत 25 धावा केल्या आहेत.
-
RCB vs GT Live Sore : डू प्लेसिसन ओढलं आसूड
आरसीबीने 3 षटकात 26 धावा केल्या. फाफ डू प्लेसिस 8 चेंडूत 17 धावा करून खेळत आहे. विराट कोहलीने 8 धावा केल्या आहेत. गुजरातकडून गोलंदाजी करताना शमीने 2 षटकांत 22 धावा दिल्या आहेत.
-
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन)
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (W), हार्दिक पांड्या (C), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल
-
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन):
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (W), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख
-
RCB vs GT : गुजरातने जिंकला टॉस
गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीचा संघ प्रथम बॅटींग करताना किती धावांचं टार्गेट देतो हे महत्त्वाचं ठरणार आहे.
-
RCB vs GT : आरसीबीसाठा सामना जिंकणं गरजेचं
आरसीबीला आजचा सामना जिंकावाच लागणार आहे. मुंबईने हैदराबाद संघाला पराभूत करत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे.
-
RCB vs GT :
आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामन्याचा टॉस 8 वाजता होणार आहे. आता पाऊस थांबला असून मैदानातील कव्हर्स काढण्यात आले आहेत.
-
RCB vs GT : टॉसला होणार उशिर
बंगळुरूमध्ये हलकासा पाऊस पडत असल्याने टॉसला उशिरा होणार आहे. रात्रीचा पाऊस केव्हाही मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे.
-
आरसीबीसाठी वाईट बातमी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात पाऊस होण्याची 60 टक्के शक्यता आहे. सामना सुरु होण्याच्या वेळेआधी पावसाची 70 टक्के शक्यता आहे. त्यानंतर पुढील 3 तासांमध्ये पाऊसाची शक्यता ही 58 ते 63 टक्के आहे.
Published On - May 21,2023 5:31 PM