RCB vs KKR IPL 2023 : जेसन रॉयकडून शाहबाज अहमदची धुलाई, एका षटकात ठोकले इतके षटकार
RCB vs KKR IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात जेसन रॉयची बॅट चांगलीच तळपली. आक्रमक खेळीने गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला.
मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील 36 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होत आहे. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली आणि फलंदाजासीठी कोलकात्याला आमंत्रण दिलं. जेसन रॉय आणि नारायण जगदीसन यांनी सावध खेळीला सुरुवात केली. मात्र त्यानंतर जेसन रॉयने आक्रमक खेळीला सुरुवात केली. त्याने 22 चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं.
कोलकात्याचा डाव
कोलकात्याकडून जेसन रॉय आणि नारायण जगदीसन ही जोडी मैदानाता उतरली. पहिल्या षटकात दोन चौकर ठोकत जेसन रॉयने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात शाहबाज अहमदला तीन सलग षटकार ठोकले. त्यानंतर एक चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर पुन्हा षटकार ठोकत कोलकात्याची गाडी रुळावर आणली. जेसन रॉयने 22 चेंडूत 50 धावा केल्या.
शाहबाज अहमदच्या पहिल्या चेंडूवर जगदीसनने एक धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर जेसन रॉयने षटकार ठोकला. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकले. त्यानंतर एक चेंडू निर्धाव गेल्याने अहमदला दिलासा मिळाला. पण त्यानंतर सहाव्या चेंडूवर पुन्हा षटकार ठोकला.
????? ??? ?????????? ?????? ???? ? ?
6⃣ 6⃣ 6⃣ 6⃣ ?? ?? ???? ?#JasonRoy #KKRvsRCB #IPL23 #KKRvRCB #RCBvsKKR #IPL #RCBvKKR #TATAIPL2023 #TATAIPL #IPL2023 #Cricket #CricketTwitterpic.twitter.com/c0IA86vVZZ
— Cricopia.com (@cric_opia) April 26, 2023
कोलकाता विरुद्ध बंगळुरुची कारकिर्द
आयपीएल 2023 स्पर्धेतील 36 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होत आहे. या दोन्ही संघातील हा 33 वा सामना आहे. आतापर्यंत झालेल्या 32 सामन्यापैकी कोलकात्याने 18, तर आरसीबीने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. मागच्या पाच सामन्यात कोलकात्याचा संघ आरसीबीवर भारी पडला आहे. आयपीएल 2023 च्या नवव्या सामन्यात दोन्ही संघ भिडले होते. या सामन्यात कोलकात्याने आरसीबीवर 81 धावांनी विजय मिळवला होता.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): एन जगदीसन (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड विसे, वैभव अरोरा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, विजयकुमार विशक, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.