RCB vs KKR IPL 2023 Highlight | बंगळुरुला स्पर्धेत दुसऱ्यांदा पाजलं पराभवाचं पाणी, कोलकात्याच्या खात्यात दोन गुण

| Updated on: Apr 26, 2023 | 11:21 PM

RCB vs KKR IPL 2023 Highlight | आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोलकात्याचा संघ बंगळुरुवर भारी पडला आहे. आतापर्यंत झालेल्या 33 सामन्यातील 19 सामने कोलकात्याने, तर 14 सामने बंगळुरुने जिंकले आहेत.

RCB vs KKR IPL 2023 Highlight | बंगळुरुला स्पर्धेत दुसऱ्यांदा पाजलं पराभवाचं पाणी, कोलकात्याच्या खात्यात दोन गुण
RCB vs KKR IPL 2023 Live Update | स्पर्धेतील पहिल्या पराभवाचा आरसीबी वचपा काढणार? केकेआरसाठी अस्तित्वाची लढाई

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला कोलकात्याने दुसऱ्यांदा पराभूत केलं. पहिल्या सामन्यात 81 धावांनी पराभूत केलं. तर आता दुसऱ्या सामन्यात 21 धावांनी पराभवाचं तोंड पाहायला मिळालं. बंगळुरुला पराभूत केल्याने केकेआरच्या स्पर्धेतील आशा अजुनही कायम आहेत. दोन गुणांचा फायदा झाल्याने आता सहा गुण झाले आहेत. अजूनही कोलकात्याला 6 सामने खेळायचे आहेत. यात काही वर खाली झालं तर नक्कीच सुपर फोरमध्ये स्थान मिळणार आहे.

गुणतालिकेत आरसीबीचा संघ पाचव्या स्थानावर आहे. तर कोलकात्याचा संघ आठव्या स्थानावर आहे. केकेआरला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी पुढील सर्व सामने जिंकणं गरजेचं आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 26 Apr 2023 11:13 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | कोलकात्याकडून बंगळुरुचा 21 धावांनी पराभव

    आयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोलकात्याचा संघ बंगळुरुवर भारी पडला आहे. कोलकात्याने बंगळुरुचा 21 धावांनी पराभव केला. आतापर्यंत झालेल्या 33 सामन्यातील 19 सामने कोलकात्याने, तर 14 सामने बंगळुरुने जिंकले आहेत.

  • 26 Apr 2023 11:12 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | बंगळुरुचा डाव

    कोलकात्याने विजयासाठी दिलेलं आव्हान गाठण्यासाठी विराट आणि फाफ जोडी मैदानात उतरली. दोघांनी आक्रमक खेळी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र त्यानंतर विकेट बाद होण्याचं सत्र सुरु झालं. फाफ 7 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला शाहबाज अहमदही चांगली कामगिरी करू शकला नाही.सुयशच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला.

    संघावर आलेलं दडपण दूर करण्यासाठी ग्लेन मॅक्सवेलनं आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही अपेक्षित यश आलं नाही. 5 धावा करून वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर बाद झाला.पॉवर प्लेमध्ये 58 धावांवर 3 गडी गमावल्याने संघावर दबाव वाढला.

    संघावर दबाव असताना विराट कोहली आणि महिपाल लोमरोर यांनी चांगली भागीदारी केली. पण जोरदार फटकेबाजी करण्याच्या नादात महिपाल लोमरोर बाद झाला. महिपालने 18 चेंडूत 34 धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली बाद झाला. त्याने 37 चेंडूत 54 धावा केल्या. त्यामुळे संघावरील दडपण आणखी वाढलं.

    विराट कोहलीनंतर दिनेश कार्तिक आणि सुयश प्रभूदेसाई यांच्यावर क्रीडाप्रेमींचा नजरा होत्या. मात्र सुयश प्रभूदेसाई धावचीत झाला. त्यामुळे सामना हातून निसटला होता. त्यानंतर दिनेश कार्तिकही काही खास करू शकला नाही. कार्तिक 18 चेंडूत 22 धावा करून बाद झाला.

  • 26 Apr 2023 11:00 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | दिनेश कार्तिकच्या रुपाने आठवा धक्का

  • 26 Apr 2023 10:57 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | वनिंदु हसरंगा बाद

  • 26 Apr 2023 10:44 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | सुयश प्रभूदेसाई बाद

  • 26 Apr 2023 10:29 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | विराट कोहली बाद झाल्याने दडपण वाढलं

  • 26 Apr 2023 10:26 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | महिपाल लोमरोर बाद

  • 26 Apr 2023 10:21 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | विराट कोहलीच्या 33 चेंडूत 51 धावा

    विराट कोहलीचं स्पर्धेतील पाचवं अर्धशतक

  • 26 Apr 2023 09:56 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | गेन मॅक्सवेल स्वस्तात बाद

    ग्लेन मॅक्सवेल संघासाठी काही विशेष करू शकला नाही. 4 चेंडूत अवघ्या पाच धावा करून बाद झाला.

  • 26 Apr 2023 09:51 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | शाहबाज अहमदच्या रुपाने दुसरा धक्का, अवघ्या 2 धावा करून बाद

  • 26 Apr 2023 09:41 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | रिंकु सिंहचा जबरदस्त झेल, फाफ 17 धावांवर बाद

  • 26 Apr 2023 09:37 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | विराट आणि फाफकडून चौकार आणि षटकारांचा वर्षाव

  • 26 Apr 2023 09:29 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | विराट कोहलीचा पहिल्याच चेंडूवर चौकार

  • 26 Apr 2023 09:15 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | कोलकात्याचा डाव

    कोलकात्याकडून जेसन रॉय आणि नारायण जगदीसन ही जोडी मैदानाता उतरली. पहिल्या षटकात दोन चौकर ठोकत जेसन रॉयने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात शाहबाज अहमदला तीन सलग षटकार ठोकले. त्यानंतर एक चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर पुन्हा षटकार ठोकत कोलकात्याची गाडी रुळावर आणली. जेसन रॉयने 22 चेंडूत 50 धावा केल्या.

    नारायण जगदीसनच्या रुपाने कोलकात्याला पहिला धक्का बसला. वैशाक विजय कुमारच्या गोलंदाजीवर 27 धावा करून बाद झाला. त्यानंतर जेसन रॉयही त्याच्या गोलंदाजीवर बाद झालाय त्याने 29 चेंडूत 56 धावांची खेळी केली. त्याने 5 षटकार आणि 4 चौकार ठोकले.

    त्यानंतर नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर यांनी डाव सावरला. तिसऱ्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर शेवटच्या षटकात फटकेबाजी करताना नितीश राणा बाद झाला. त्यानंतर वेंकटेश अय्यर 31 धावा करून बाद झाला.

    मोहम्मद सिराजच्या गोलंदाजी आंद्रे रसेल त्रिफळाचीत झाला. तो फक्त 2 चेंडू खेळत तंबूत परतला. रिंकु सिंह 18 आणि डेविड विस 12 या धावांवर नाबाद राहिले.

  • 26 Apr 2023 09:15 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | कोलकात्याच्या पाच गडी बाद 200 धावा

    कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 200 धावा केल्या. बंगळुरुला विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे आव्हान गाठतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 26 Apr 2023 09:08 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | आंद्रे सरेलला मोहम्मद सिराजने दाखवला तंबूचा रस्ता

  • 26 Apr 2023 09:06 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | रिंकु सिंहची जबरदस्त फटकेबाजी

  • 26 Apr 2023 09:02 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | नितीश राणानंतर वेंकटेश अय्यर 31 धावा करून बाद

  • 26 Apr 2023 08:59 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | नितीश राणा बाद

  • 26 Apr 2023 08:50 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | नितीश राणाची फटकेबाजी सुरु, कोलकात्याचं मजेशीर ट्वीट

  • 26 Apr 2023 08:22 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | जेसन रॉयच्या रुपाने दुसरा धक्का

  • 26 Apr 2023 08:16 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | कोलकात्याला जगदीसनच्या रुपाने पहिला धक्का

  • 26 Apr 2023 08:06 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | जेसन रॉयचं आक्रमक अर्धशतक, 22 चेंडूत 50 धावा

  • 26 Apr 2023 07:59 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | पॉवर प्लेमध्ये कोलकात्याच्या बिनबाद 66 धावा

    जेसन रॉयची तुफान फटकेबाजी सुरु आहे. सहाव्या षटकात 4 षटकार ठोकत संघाची गाडी रुळावर आणली आहे. पहिल्या गड्यासाठी जेसन रॉय आणि जगदीसननं अर्धशतकी भागीदारी केली आहे.

  • 26 Apr 2023 07:57 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | जेसन रॉयची फटकेबाजी, सलग तीन षटकार ठोकले

  • 26 Apr 2023 07:33 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | जेसन रॉयची चौकाराने सुरुवात

  • 26 Apr 2023 07:30 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | जेसन रॉय आणि नारायण जगदीसन फलंदाजीसाठी मैदानात

  • 26 Apr 2023 07:10 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | कोलकात्याची प्लेइंग इलेव्हन

    कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): एन जगदीसन (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड विसे, वैभव अरोरा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती

  • 26 Apr 2023 07:09 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | बंगळुरुची प्लेइंग इलेव्हन

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, विजयकुमार विशक, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.

  • 26 Apr 2023 07:04 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | नितीश राणाने व्यक्त केला विजयाचा विश्वास

    सामना कुठूनही बदलू शकतो, आम्ही या सामन्यातून पुनरागमन करणार आहोत, असं कोलकात्याचा कर्णधार नितीश राणाने सांगितलं.

  • 26 Apr 2023 07:02 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | नाणेफेकीचा कौल बंगळुरुच्या बाजूने, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

  • 26 Apr 2023 04:45 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | केकेआरचा सूर बिघडला

    आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या स्पर्धेची सुरुची पराभवाने केली. त्यानंतर आरसीबी आणि गुजराज टायटन्सला पराभूत केलं. त्यानंतर या सलग चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

  • 26 Apr 2023 04:42 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | कोलकात्याचा संपूर्ण स्क्वॉड

    कोलकात्याचा पूर्ण स्क्वॉड : नीतीश राणा, रिंकू सिंह, रहमनुल्लाह गुरबाज, डेविड वीजा, कुलवंत खेजरोलिया, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, लॉकी फर्गयूसन, आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, उमेश यादव, हर्षित राणा, टिम साउदी, शार्दुल ठाकुर, सुनील नरेन, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, नारायण जगदीशन, लिट्टन दास, मनदीप सिंह आणि शाकिब अल हसन.

  • 26 Apr 2023 04:41 PM (IST)

    RCB vs KKR IPL 2023 Live Update | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संपूर्ण स्क्वॉड

    बंगळुरुचा पूर्ण स्क्वॉड : फाफ डु प्लेसी, विराट कोहली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोड, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदु हसारंगा, आकाश दीप, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेविड विली, मोहम्मद सिराज, जॉश हेझलवुड, सिद्धार्थ कौल ,हिमांशु शर्मा, मनोज भंडागे, अविनाश सिंह, राजन कुमार, सोनू यादव, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन एलेन आणि रीस टॉपले.

Published On - Apr 26,2023 4:39 PM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.