मुंबई: क्रिकेटच्या मैदानात फलंदाजाचे मोठे फटके नेहमीच एक वेगळा आनंद देतात. बॅट्समनने SIX मारल्यानंतर चाहत्यांचा स्टेडियममध्ये जल्लोष सुरु होतो. पण काही वेळा षटकार एखाद्यासाठी काळ बनतो. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एखाद्याला गंभीर दुखापत होते. 13 मे रोजी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दरम्यान झालेल्या सामन्यावेळी हेच पहायला मिळालं. RCB च्या डावा दरम्यान हे घडलं. या घटनेने खूप वर्षापूर्वीची सौरव गांगुली बाबतची एक आठवण ताजी झाली. बँगलोरच्या रजत पाटीदारने (Rajat Patidar) लांबलचक षटकार खेचला. पण त्यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आजोबांच्या डोक्यावर जाऊन हा बॉल आदळला. बँगलोरच्या इनिंगमध्ये 9 व्या षटकात हे घडलं. पंजाबचा हरप्रीत बराड गोलंदाजी करत होता. त्या षटकातील चौथ्या चेंडूवर रजत पाटीदारने लांबलचक सिक्स मारला. त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेला एका वृद्ध माणसाला दुखापत झाली.
चेंडूला डोक्याला लागल्यानंतर ती वृद्ध व्यक्ती विव्हळताना दिसली. त्यांना वेदन सहन होत नव्हत्या. त्यांच्या जवळ बसलेले नातलग त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते. सुदैवाने त्या वृद्धाचं डोकं फुटलं नाही.
भारतीय फलंदाजाच्या बॅट मधून निघालेल्या षटकाराने चाहता घायाळ होण्याची ही पहिली घटना नाहीय. याआधी ऑगस्ट 2002 मध्ये सुद्धा अस झालय. हेडिंग्ले टेस्टच्या दुसऱ्यादिवशी गांगुलीने षटकार ठोकला होता. एका वृद्ध व्यक्तीच्या डोक्यावर सिक्स मारलेला चेंडू आदळला होता. त्यावेळी त्या वृद्धाचं बॉल लागल्याने डोक फुटलं होतं. सौरव गांगुलीने त्या सामन्यात 128 धावा केल्या होत्या. भारताने तो सामना एक डाव आणि 46 धावांनी जिंकला होता.
— Varma Fan (@VarmaFan1) May 13, 2022
कालच्या पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात रजत पाटीदारने 21 चेंडूत 26 धावा फटकावल्या. 54 धावांनी बँगलोरचा पराभव झाला. IPL मध्ये ही 15 वी वेळ आहे, जेव्हा आरसीबीचा 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी पराभव झालाय.