RCB vs RR IPL 2023 Score : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा राजस्थावर 7 धावांनी विजय
RCB vs RR IPL 2023 Live Scor Score Updates | IPL 2023 चा 32 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. आरसीबीने 20 ओव्हर्समध्ये 189 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघाला 182 धावांपर्यंत मजल मारता आली नाही.
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामधील सामन्यामध्ये आरसीबीने 7 धावांनी विजय मिळवला आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यामध्ये हर्षल पटेल याने जबरदस्त बॉलिंग करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. आरसीबीने 20 ओव्हर्समध्ये 189 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघाला 182 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. आरसीबीकडून हर्षल पटेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (C), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (W), सुयश प्रभुदेसाई, डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख
LIVE Cricket Score & Updates
-
IPL 2023 RCB vs RR : आरसीबी Win
राजस्थान संघाचा 7 धावांनी पराभव झाला आहे. आरसीबीने पॉइंट टेबलमध्ये आपलं स्थान मजबूत केलं आहे.
-
RCB vs RR IPL 2023 Live Score : राजस्थानला तिसरा झटका
राजस्थान रॉयल्सची चौथी विकेट गेली असून कर्णधार संजू सॅमसन 15 चेंडूत 22 धावा करून बाद झाला आहे. हर्षल पटेलने त्याला आऊट केलं. आता राजस्थान संघाला विजयासाठी 28 चेंडूत 65 धावांची गरज आहे.
-
-
RCB vs RR IPL 2023 Live Score : जयस्वाल आऊट
राजस्थान रॉयल्सची तिसरी विकेट गेली आहे. यशस्वी जयस्वाल 37 चेंडूत 47 धावा करून बाद झाला आहे. हर्षल पटेलने त्याला विराट कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडलं. राजस्थानला विजयासाठी 38 चेंडूत 82 धावांची गरज आहे.
-
RCB vs RR IPL 2023 Live Score : राजस्थानला दुसरा झटका
देवदत्त पडिक्कलने शानदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावलं. 31 चेंडूत त्याने 51 धावा केल्यानंतर खेळत होता. मात्र अर्धशतक झाल्यावर विलीला मोठा फटका मारण्याच्या नादात तो आऊट झाला आहे. त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला. जयस्वाल 45 धावांवर खेळत आहे.
-
RCB vs RR IPL 2023 Live Score : जयस्वाल, देवदत्तने सावरलं
राजस्थान रॉयल्सने 6 षटकात 47 धावा केल्या. जयस्वाल 19 चेंडूत 26 धावा करून खेळत आहे. देवदत्तने 15 चेंडूत 21 धावा केल्या आहेत. या दोघांमध्ये 46 धावांची भागीदारी झाली आहे.
-
-
RCB vs RR IPL 2023 Live Score : राजस्थानला पहिला झटका
राजस्थान संघाच्या 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाला 1 धावसंख्येवर पहिला धक्का जोस बटलरच्या रूपाने बसला. तो खातेही न उघडता मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला.
-
RCB vs RR IPL 2023 Live Score : राजस्थानला 190 धावांचं आव्हान
आयपीएलमधील 32 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसन याने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीने पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित 20 षटकात 189 धावा केल्या आहेत. फाफ डू प्लेसिस 62 धावा आणि ग्लेन मॅक्सवेल 77 धावा यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने धावांचा 189 डोंगर उभारला आहे. राजस्थानला जिंकण्यासाठी 190 धावांची गरज आहे.
-
RCB vs RR, Live Score : कार्तित आऊट
दिनेश कार्तिकही आऊट झाला. 13 चेंडूत 16 धावा करून तो परतला, संदीप शर्माने त्याला आऊट केलं.
-
RCB vs RR, Live Score : सुयश आऊट
आरसीबी संघाची सगल दुसरी विकेट गेली आहे. सुयश भोपळा नं फोडताही माघारी गेला आहे. RCB च्या 163 धावा झाल्या आहेत. आणखी 19 चेंडू शिल्लक आहेत.
-
RCB vs RR IPL 2023 Live Score : महिपाल लोमरर आऊट
आरसीबीची पाचवी विकेट गेली असून महिपाल लोमरर 8 धावा करून बाद झाला. त्याला युझवेंद्र चहलने आऊट केलं. 16.4 षटकांत 5 गडी गमावून 163 धावा आरसीबीच्या धावा झाल्या आहेत.
-
RCB vs RR IPL 2023 Live Score : मॅक्सवेल आऊट
आरसीबीची चौथी विकेट गेली आहे. ग्लेन मॅक्सवेल 44 चेंडूत 77 धावा करून बाद झाला. त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. अश्विनने मॅक्सवेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
-
RCB vs RR IPL 2023 Live Score : फाफ रन आऊट
आरसीबीला तिसरी विकेट गेली असून फाफ डू प्लेसिस 39 चेंडूत 62 धावा करून बाद झाला. त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. डुप्लेसिसला यशस्वी जयस्वालने धावबाद केले. संघाने 13.2 षटकांत 3 गडी गमावून 139 धावा केल्या आहेत.
-
RCB vs RR IPL 2023 Live Score : फाफ डू प्लेसिसचं अर्धशतक
मॅक्सवेलनंतर फाफ डू प्लेसिसनेही आपले अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 33 चेंडूत 55 धावा केल्या आहेत. या दोघांमध्ये 116 धावांची भागीदारी झाली आहे. आरसीबीने 12 षटकात 128 धावा केल्या आहेत.
-
RCB vs RR IPL 2023 Live Score : पॉवर प्ले
आरसीबीने 6 षटकांत 2 गडी गमावून 62 धावा केल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेल 14 चेंडूत 31 धावा करून खेळत आहे. त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारले आहेत. तर फाफ डू प्लेसिस 17 चेंडूत 29 धावा केल्यानंतर खेळत आहे. या दोघांची अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली आहे.
-
RCB vs RR IPL 2023 Live Score : आरसीबीच्या 50 धावा पूर्ण
आरसीबीने 5 ओव्हरमध्ये 2 गडी गमावून 50 धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेल 20 धावा करून खेळत आहे. डुप्लेसिस 28 धावांवर खेळत आहेत.
-
RCB vs RR, Live Score : बोल्टचा दुसरा झटका
RCB vs RR Score : 3 Over 22-2
विराट कोहली पाठोपाठ बोल्ट याने शाहबाज अहमदला आऊट करत संघाला दुसरं यश मिळवून दिलं आहे. विराट कोहली 0 आणि अहमद 2 धावा करून बाद झाले आहेत. आता मॅक्सवेल मैदानात उतरला आहे.
-
RCB vs RR, Live Score : विराट कोहली आऊट
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस सलामीला आले होते. खतरनाक ट्रेंट बोल्टने कोहलीला पहिल्याच चेंडूवर आऊट केलं. आता मैदानात शाहबाज अहमद आला आहे.
-
RCB vs RR, Live Score : दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (C), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (W), सुयश प्रभुदेसाई, डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख
-
RCB vs RR IPL 2023 Live Score | ‘सिराज’अस्त्र
आरसीबीचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज दमदार फॉर्ममध्ये आहे. सिराज याने आत्तापर्यंत 12 विकेट घेतल्या आहेत. पुन्हा एकदा त्याच्याकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
-
कोण मारणार बाजी
RCB vs RR IPL 2023 Live Score |
गेल्या वर्षी राजस्थानने आरसीबीला दोनदा पराभूत केले होते. त्यामुळे आता आरसीबी आपल्या पराभवाची परतफेड करणार की नाही याकडे क्रिकेट चाहत्यांंचं लक्ष लागलेलं आहे.
Published On - Apr 23,2023 2:37 PM