RCB vs RR, IPL 2021 Match 16 Result | देवदत्त पडीक्कलचे शतक, विराटची शानदार खेळी, बंगळुरुचा विजयी ‘चौकार’, राजस्थानवर 10 विकेट्सने मात

| Updated on: Apr 22, 2021 | 11:12 PM

RCB vs RR 2021 Live Score Marathi | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स लाईव्ह अपडेट्स

RCB vs RR, IPL 2021 Match 16 Result | देवदत्त पडीक्कलचे शतक, विराटची शानदार खेळी, बंगळुरुचा विजयी 'चौकार', राजस्थानवर 10 विकेट्सने मात
RCB vs RR 2021 Live Score Marathi | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स लाईव्ह अपडेट्स

मुंबई | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) राजस्थान रॉयल्सवर (Rajasthan Royals) 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. राजस्थानने बंगळुरुला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरने एकही विकेट न गमावता 16.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. बंगळुरुकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक 101 धावांची नाबाद खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीने नाबाद 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. बंगळुरुचा या मोसमातील हा सलग चौथा विजय ठरला. (rcb vs rr live score ipl 2021 match royal challengers bangalore vs rajasthan royals scorecard online wankhede stadium mumbai in marathi)

Key Events

बंगळुरुचा विजयी चौकार

बंगळुरुने राजस्थानचा 10 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह बंगळुरुचा हा या मोसमातील सलग चौथा विजय ठरला आहे. यासह बंगळुरुने पॉइंट्सटेबलमध्ये 8 गुणांसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. बंगळुरुने मोठा विजय साकारल्याने विराटसेनेला नेट रनरेटमध्ये मोठा फायदा झा

देवदत्त पडीक्कलचे अफलातून शतक

बंगळुरुचा युवा सलामीवीर देवदत्त पडीक्कलने चौकार ठोकत 51 चेंडूत शतक झळकावलं आहे. देवदत्तच्या आयपीएल कारकिर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं आहे. देवदत्त आयपीएलमध्ये शतक लगावणारा तिसरा युवा फलंदाज ठरला आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 22 Apr 2021 11:01 PM (IST)

    बंगळुरुचा विजयी चौकार

    बंगळुरुने राजस्थानवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे.  बंगळुरुचा हा या मोसमातील सलग चौथा विजय ठरला आहे. या विजयासह बंगळुरुने पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

  • 22 Apr 2021 10:55 PM (IST)

    चौकारासह देवदत्त पडीक्कलचे धमाकेदार शतक

    चौकार खेचत  देवदत्त पडीक्कलने धमाकेदार शतक पूर्ण केलं आहे. देवदत्तने 51 चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलं शतक साजरं केलं. 

     
     
  • 22 Apr 2021 10:42 PM (IST)

    14 व्या ओव्हरमध्ये 17 धावा

    बंगळुरुच्या विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल सलामी जोडीने 14 व्या ओव्हरमध्ये 17 धावा कुटल्या आहेत. यामध्ये 2 फोर आणि 1 सिक्सचा समावेश आहे.

  • 22 Apr 2021 10:38 PM (IST)

    विराट कोहलीचा कारनामा

    विराट कोहलीने कारनामा  केला आहे. विराटने आयपीएलमध्ये 6 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराट अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. विराटने चौकार ठोकत 6 हजार धावांटा टप्पा ओलांडला.

  • 22 Apr 2021 10:36 PM (IST)

    कर्णधार विराट कोहलीचे शानदार अर्धशतक

    कर्णधार विराट कोहलीने 34 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. विराटच्या आयपीएलच्या कारकिर्दीतील 40 वं अर्धशतक ठरलं.

  • 22 Apr 2021 10:33 PM (IST)

    विराटचा जोरदार सिक्स

    कर्णधार विराट कोहलीने 13 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर सिक्स खेचला आहे.

  • 22 Apr 2021 10:22 PM (IST)

    देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली सलामी जोडीची शतकी भागीदारी

    देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली आहे. देवदत्तने खेचलेल्या सिक्ससह बंगळुरुने 100धावांचा टप्पा ओलांडला आहे.

  • 22 Apr 2021 10:17 PM (IST)

    देवदत्त पडीक्कलचे सलग 2 सिक्स

    देवदत्तन पडीक्कलने 9 व्या ओव्हरमधील शेवटच्या 2 चेंडूत सलग 2 सिक्स लगावले आहेत.

  • 22 Apr 2021 10:13 PM (IST)

    देवदत्त पडीक्कलचे चौकारासह शानदार अर्धशतक

    देवदत्त पडीक्कलने चौकारासह शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे.  देवदत्तने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे.

  • 22 Apr 2021 10:04 PM (IST)

    विराट-देवदत्त सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी

    कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.

  • 22 Apr 2021 09:59 PM (IST)

    देवदत्त पडीक्कलचा शानदार सिक्स

    देवदत्त पडीकक्लने 5 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सिक्स खेचला. यासह बंगळुरुच्या 49 धावा पूर्ण झाल्या आहेत.

  • 22 Apr 2021 09:53 PM (IST)

    चौथ्या ओव्हरमध्ये देवदत्तचे सलग 2 चौकार

    देवदत्त पडीक्कलने सामन्यातील चौथ्या ओव्हरमध्ये  सलग 2 चेंडूत 2 चौकार लगावले आहेत.

  • 22 Apr 2021 09:50 PM (IST)

    पडीक्कलचे तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 चौकार

    देवदत्त पडीक्कलने श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 चौकार लगावले आहेत. यासह देवदत्त 14 धावांवर पोहचला आहे.

  • 22 Apr 2021 09:41 PM (IST)

    बंगळुरु आणि विराटची सिक्सने सुरुवात

    बंगळुरु आणि कर्णधार विराट कोहलीने सिक्स लगावत सुरुवात केली आहे. विराटने श्रेयस गोपाळच्या बोलिंगवर सिक्स लगावला.

  • 22 Apr 2021 09:39 PM (IST)

    बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात

    बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 22 Apr 2021 09:28 PM (IST)

    बंगळुरुला विजयासाठी 178 धावांचे आव्हान

    राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 177 धावा केल्या आहेत. शिवम दुबेने 46 तर राहुल तेवतियाने 40 धावांची झुंजार खेळी केली. बंगळुरुकडून मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

  • 22 Apr 2021 09:20 PM (IST)

    राजस्थानला आठवा झटका

    राजस्थानने आठवी विकेट गमावली आहे. ख्रिस मॉरीस आऊट झाला आहे.

  • 22 Apr 2021 09:19 PM (IST)

    राजस्थानला सातवा धक्का

    राजस्थानने सातवी विकेट गमावली आहे. राहुल तेवतिया 40 धावा केल्या.

  • 22 Apr 2021 09:14 PM (IST)

    राहुल तेवतियाचा सिक्स

    राहुल तेवतियाने 19 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर मोहम्मद सिराजच्या बोलिंगवर सिक्स लगावला आहे.

  • 22 Apr 2021 09:11 PM (IST)

    ख्रिस मॉरिसचा सुपर सिक्स

    ख्रिस मॉरिसने 18 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर कायले जेमिन्सच्या गोलंदाजीवर सिक्स खेचला. यासह राजस्थानचा स्कोअर 18 ओव्हरनंतर 6 बाद 157 असा झाला आहे.

  • 22 Apr 2021 08:58 PM (IST)

    राजस्थानला सहावा झटका

    राजस्थानला सहावा झटका बसला आहे. शिवम दुबे आऊट झाला आहे. शिवम दुबेने 32 चेंडूत 5 फोर आणि 2 सिक्ससह 46 धावांची खेळी केली. 
     
     
  • 22 Apr 2021 08:54 PM (IST)

    राजस्थानचा 15 ओव्हरनंतर स्कोअर

    राजस्थानने 15 ओव्हरनंतर 5 विकेट्स गमावून 128 धावा केल्या आहेत. शिवम दुबे आणि राहुल तेवतिया मैदानात खेळत आहेत.

  • 22 Apr 2021 08:47 PM (IST)

    राहुल तेवतियाचा सिक्स

    राहुल तेवतियाने सिक्स खेचत आपल्या खेळीची सुरुवात केली आहे.

  • 22 Apr 2021 08:45 PM (IST)

    रियान पराग आऊट

    राजस्थानला पाचवा धक्का बसला आहे.  रियान पराग आऊट झाला आहे. रियानने 16 चेंडूत 4 चौकारांसह 25 धावांची खेळी केली. 
     
     
  • 22 Apr 2021 08:38 PM (IST)

    रियान परागचा चौकार

    रियान परागने चौकार ठोकला आहे. या चौकारासह राजस्थानच्या 100 धावा पूर्ण केल्या आहेत.

  • 22 Apr 2021 08:36 PM (IST)

    राजस्थानचा 12 ओव्हरनंतर स्कोअर

    राजस्थानने 12 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 96 धावा केल्या आहेत. शिवम दुबे आणि रियान पराग मैदानात खेळत आहेत.

  • 22 Apr 2021 08:27 PM (IST)

    राजस्थानचा 10 ओव्हरनंतर स्कोअर

    राजस्थानने 10 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 70 धावा केल्या आहेत. शिवम दुबे आणि रियान पराग मैदानात खेळत आहेत.

  • 22 Apr 2021 08:18 PM (IST)

    शिवम दुबेचा कडक सिक्स

    शिवम दुबेने युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर 9 व्या ओव्हरमध्ये दमदार सिक्स लगावला आहे.

  • 22 Apr 2021 08:16 PM (IST)

    शिवम दुबेचा शानदार सिक्स

    शिवम दुबेने युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर 9 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर  83 मीटरचा शानदार सिक्स लगावला आहे.

  • 22 Apr 2021 08:12 PM (IST)

    राजस्थानला मोठा धक्का

    राजस्थानला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार संजू सॅमसन आऊट झाला आहे. संजूने 18 चेंडूत 2 फोर आणि 1 सिक्ससह 21 धावांची खेळी केली.
     
     
  • 22 Apr 2021 08:05 PM (IST)

    राजस्थानचा पावर प्लेनंतरचा स्कोअर

    राजस्थानने पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर 3 विकेट्स गमावून 32 धावा केल्या आहेत. कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे मैदानात खेळत आहेत.

  • 22 Apr 2021 07:56 PM (IST)

    राजस्थानला तिसरा धक्का

    राजस्थानला तिसरा धक्का बसला आहे. डेव्हीड मिलर आऊट झाला आहे.

  • 22 Apr 2021 07:49 PM (IST)

    राजस्थानला दुसरा धक्का

    राजस्थानला दुसरा धक्का बसला आहे. मनन वोहरा कॅच आऊट झाला आहे. वोहरा 7 धावा करुन बाद झाला.

  • 22 Apr 2021 07:43 PM (IST)

    राजस्थानला पहिला झटका

    राजस्थानने  पहिली विकेट गमावली आहे. सलामीवीर जोस बटलर आऊट झाला आहे. मोहम्मद सिराजने बटलरला बोल्ड केलं आहे.

  • 22 Apr 2021 07:34 PM (IST)

    राजस्थानची आणि बटलरची चौकाराने सुरुवात

    जॉस बटलर आणि राजस्थानची चौकाराने सुरुवात झाली आहे. राजस्थानने पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकारांसह 8 धावा केल्या आहेत.

  • 22 Apr 2021 07:32 PM (IST)

    राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात

    राजस्थानच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. जॉस बटलर आणि मनन वोहरा सलामी जोडी मैदानात खेळत आहे.

  • 22 Apr 2021 07:18 PM (IST)

    अशी आहे विराटसेना

    विराट कोहली (कर्णधार), देवदत्‍त पडीक्‍कल, एबी डिव्हीलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, कायले जेमीन्सन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल

  • 22 Apr 2021 07:16 PM (IST)

    राजस्थान रॉयल्‍सची प्लेइंग इलेव्हन

    संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), जॉस बटलर, मनन वोहरा, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, शिवम दुबे, ख्रिस मोरिस, श्रेयस गोपाळ, मुस्तफिजुर रहमान आणि चेतन साकरिया

  • 22 Apr 2021 07:14 PM (IST)

    दोन्ही संघात बदल

    या सामन्यासाठी दोन्ही संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटच्या जागी लेग स्पिनर श्रेयस गोपाळला संधी देण्यात आली आहे. गोपळचा एबी डी व्हीलियर्स आणि विराट कोहली विरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे.

    तसेच बंगळुरुमध्येही एकमेव बदल करण्यात आला आहे. रजत पाटीदारच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या केन रिचर्डसनला संधी दिली आहे. बंगळुरुकडून रिचर्डसनचा हा पहिलाच सामना आहे.

  • 22 Apr 2021 07:04 PM (IST)

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टॉस जिंकला

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टॉस जिंकला आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

  • 22 Apr 2021 06:37 PM (IST)

    बंगळुरु विरुद्ध राजस्थान आमनेसामने

    आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 16 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे.

Published On - Apr 22,2021 11:01 PM

Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.