RCB vs RR, Qualifier 2 Live Streaming : जाणून घ्या कधी, कुठे पाहू शकता IPL 2022चा बंगळुरू विरुद्ध राजस्थान सामना
RCB vs RR, Qualifier 2 Live Match : राजस्थानचा संघ क्वालिफायरचा पहिला सामना हरला आहे. तर RCB ने लखनौवर विजय मिळवून क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे.
मुंबई : आज आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) क्वालिफायर 2 खेळायचा आहे. हा क्वालिफायर 2 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) असा असणार आहे. राजस्थानचा संघ क्वालिफायरचा पहिला सामना हरला आहे. तर RCB ने लखनौवर विजय मिळवून क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. आता पुढचे दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहेत. ग्रुप स्टेजमध्ये दोन्ही संघांनी कामगिरी कशी केली, ते आता महत्त्वाचं नाही. आता प्लेऑफची स्टेज आहे. नशिबामुळे आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला, पण एलिमिनेटरमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने लखनौला हरवलं, ते पाहता राजस्थानसाठी हा सामना सोपा नाहीय. क्वालिफायर वन मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थानला पराभूत केलं होतं. या जय-पराजयामुळे वाढलेल्या आणि खचलेल्या मनोबलाचा परिणाम सामन्यामध्ये दिसू शकतो.
आज संध्याकाळी साडेसात वाजता बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना सुरू होईल. आयपीएलच्या पॉईंट्स टेबलबद्दल विचार केल्यास. राजस्थान रॉयल्स या संघाने एकूण चौदा सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना नऊ सामने जिंकले असून पाच सामन्यात त्यांना अपयश आलंय. राजस्थानचा नेटरेट 0.298 आहे. तर अठरा पॉईंट्स राजस्थानला पॉईंट्स टेबलमध्ये मिळाले आहेत. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने देखील चौदा सामने खेळले असून आठ सामन्यात त्यांना यश आलंय तर सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. बंगळुरूचा नेटरेट -0.253 आहे. तर 16 पॉईंट्स बंगळुरूला मिळाले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना कधी खेळवला जाईल?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल 2022 मधील सामना आज 27 मे (शुक्रवारी) रोजी खेळवला जाणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना कधी सुरू होईल?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी सात वाजता होईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहता येईल?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्हीवर पाहता येईल. तुम्ही Tv9marathi.com वर सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स वाचू शकता.