RCB vs UPW, Video : ग्रेस हॅरिसला ‘तो’ शॉट खेळणं पडलं महागात, रिचा घोषच्या जाळ्यात सहज अडकली

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि युपी वॉरियर्स यांच्यात महत्त्वाचा सामना पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 23 धावांनी जिंकला. या सामन्यात बंगळुरुने सर्वच स्तरावर चांगली कामगिरी केली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही उत्तम केलं. या सामन्यात रिचा घोषच्या झेलची चर्चा रंगली आहे.

RCB vs UPW, Video : ग्रेस हॅरिसला 'तो' शॉट खेळणं पडलं महागात, रिचा घोषच्या जाळ्यात सहज अडकली
RCB vs UPW, Video : ग्रेस हॅरिस अडकली रिचा घोषच्या जाळ्यात, गॅप शोधून शॉट्स मारला खरा पण..
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 9:49 PM

मुंबई : युपी वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेकीचा कौल गमवला. त्यामुळे स्मृती मंधाना थोडी नाराज दिसली होती. नाणेफेकीनंतर तिने सांगितलं की, कौल आमच्या बाजूने लागला असता तर गोलंदाजी घेतली असती. त्यामुळे फलंदाजीत चांगली कामगिरी करावी लागेल असं तिने स्पष्ट केलं होतं. त्या प्रमाणे बंगळुरुने आक्रमक सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी सब्भीनेनी मेघना आणि स्मृती मंधाना हीने 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मृती मंधाना आणि एलिसा पेरीने 95 धावांची पार्टनरशिप केली. स्मृती मंधानाने 50 चेंडूत 80 धावा केल्या. तर एलिसा पेरीने 37 चेंडूत 58 धावांची खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 3 गडी गमवून 198 धावा केल्या आणि विजयासाठी 199 धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी युपी वॉरियर्सने आक्रमक सुरुवात केली. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जाळ्यात युपी वॉरियर्सचे फलंदाज अडकले आणि विकेट्स गमावल्या. यात विकेटकीपर रिचा घोष हीने हरिस उत्तम झेल पकडला.

संघाच्या 63 धावा असताना ग्रेस हरीस मैदानात उतरली. तिसऱ्या विकेटसाठी ग्रेस हरीस आणि एलिसा हिली चांगली भागीदारी करेल अशी अपेक्षा होती. ग्रेस हॅरीसने शॉट्स आणि गॅप डोक्यात ठेवून होती. विकेटमागे सहज झटपट धावा मिळतील असा तिला अंदाज होता. पण रिचा घोषने तिची स्ट्रॅटर्जी ओळखली होती. ग्रेस हॅरीस मागे शॉट्स खेळणार हा अंदाज आला. तिने जसा पाठी मारण्यासाठी बॅट बॉल लावला तशी रिचाने त्या दिशेने उडी घेतली. सोफी डिवाईनच्या गोलंदाजीवर ग्रेस हॅरिस सहज फसली. सुपरवुमन रिचा घोषने झेल घेतला. तिला अवघ्या 5 धावा करून तंबूत परतावं लागलं.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, एकता बिश्त, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर, अंजली सरवानी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.