Smriti Mandhana च्या नशिबात काय लिहिलय? आज होणार फैसला

| Updated on: Mar 15, 2023 | 11:02 AM

RCB vs UPW WPL 2023 : स्मृती मांधना भारतीय महिला क्रिकेटमधील यशस्वी खेळाडू, पण नशिबाची साथ नाहीय. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला हरवलय, ही आरसीबीसाठी चांगली बाब आहे.

Smriti Mandhana च्या नशिबात काय लिहिलय? आज होणार फैसला
smirti mandhana
Image Credit source: PTI
Follow us on

RCB vs UPW WPL 2023 : महिला प्रीमियर लीगमध्ये स्मृती मांधनासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. तिच्या नशिबात काय लिहिलय ते आज समजेल. RCB संदर्भात आज एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. ज्या प्रमाणे मुंबई इंडियन्स WPL 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरलीय, त्याचप्रमाणे RCB टुर्नामेंटमधून बाहेर होणारा पहिला संघ ठरणार ? ते आज ठरणार आहे.

WPL 2023 मध्ये आज संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना यूपी वॉरियर्स विरुद्ध होणार आहे. ही मॅच दोन्ही टीम्ससाठी महत्त्वाची आहे. स्मृती मांधनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या RCB साठी या सामन्याच मोल थोडं जास्त आहे. इतका महत्त्वपूर्ण सामना कोण कसं हरु शकतं? RCB च्या पराभवास, तर मनाई आहे.

आज होणार निर्णय

यूपी वॉरियर्स विरुद्ध पराजय आणि विजयाचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीमवर काय परिणाम होईल, ते जाणून घ्या. RCB ची टीम आजची मॅच हरली, तर टुर्नामेंटमध्ये त्यांच्यासाठी सर्वकाही संपून जाईल. अधिकृतपणे WPL 2023 च्या बाहेर होणारी RCB पहिली टीम ठरेल.

टुर्नामेंटमध्ये पुढे RCB साठी काय घडलं पाहिजे?

RCB च्या टीमने मॅच जिंकली, तर स्पर्धेत रोमांच निर्माण होईल. विजयामुळे स्पर्धेतील त्यांच आव्हान टिकून राहील. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला हरवलय, ही आरसीबीसाठी चांगली बाब आहे. RCB ला यापुढचे आपले सर्व सामने जिंकावेच लागतील. दिल्ली कॅपिटल्सने पुढच्या सामन्यात यूपी वॉरियर्सला हरवलं पाहिजे. गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्स विरुद्ध आपला पुढचा सामना जिंकला, तर त्या स्थितीत स्मृती मांधना अँड कंपनीच नशीब चमकू शकतं.

RCB ला जिंकावच लागेल

RCB टीमचा आतापर्यंत वूमेन्स प्रीमियर लीगमधील सर्वच्या सर्व सामन्यात पराभव झालाय. ही टीम 5 मॅच खेळलीय, पाचही सामन्यात त्यांचा पराभव झालाय. आता यूपी वॉरियर्स विरुद्ध सहाव्या सामन्यात त्यांना विजय मिळवावाच लागेल.