वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर, या दिवशी होणार भारत पाकिस्तान सामना

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा बांगलादेशमधून युएईत स्थलांतरीत केली आहे. बांगलादेशमधील राजकीय स्थिती आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. आता स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक आयसीसीने जारी केलं आहे. चला जाणून भारत पाकिस्तान सामन्याचं वेळापत्रक

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर, या दिवशी होणार भारत पाकिस्तान सामना
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 8:40 PM

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या थरार 3 ऑक्टोबरपासून अनुभवता येणार आहे. बांगलादेशमध्ये यापूर्वी ही स्पर्धा होणार होती. पण बांगलादेशमध्ये राजकीय उलथापालथ झाली आणि सर्वच चित्र बदललं. हिंसाचाराच्या वाढत्या घटना पाहून तिथे स्पर्धा भरवणं कठीण होतं. त्यामुळे आयसीसीने ही स्पर्धा यूएईत भरवण्याचा निर्णय घेतला. आता ही स्पर्धा शारजाह क्रिकेट स्टेडियम आणि दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेोळवली जाईल. या स्पर्धेतील पहिला सामना 3 ऑक्टोबरला बांग्लादेश आणि स्कॉटलँड यांच्यात होणार आहे. भारतीय महिला संघाचा पहिला सामना 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होईल. तर भारत आणि पाकिस्तान संघ 6 ऑक्टोबरला आमनेसामने येतील. या स्पर्धेत एकूण 23 सामने होणार असून अंतिम सामना 20 ऑक्टोबरला होणार आहे.

स्पर्धेचं पूर्ण वेळापत्रक

तारीख सामने गट वेळ स्थान
3 ऑक्टोबर, गुरुवार बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड दुपारी 3:30 वा  शारजाह
3 ऑक्टोबर, गुरुवार पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संध्याकाळी 7:30 वा  शारजाह
4 ऑक्टोबर, शुक्रवार दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज दुपारी 3:30 वा  दुबई
4 ऑक्टोबर, शुक्रवार भारत विरुद्ध न्यूझीलंड संध्याकाळी 7:30 वा  दुबई
5 ऑक्टोबर, शनिवार बांगलादेश विरुद्ध इंग्लंड दुपारी 3:30 वा  शारजाह
5 ऑक्टोबर, शनिवार ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संध्याकाळी 7:30 वा  शारजाह
6 ऑक्टोबर, रविवार भारत विरुद्ध पाकिस्तान दुपारी 3:30 वा  दुबई
6 ऑक्टोबर, रविवार वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड संध्याकाळी 7:30 वा  दुबई
7 ऑक्टोबर, सोमवार इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संध्याकाळी 7:30 वा  शारजाह
8 ऑक्टोबर, मंगळवार ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संध्याकाळी 7:30 वा  शारजाह
9 ऑक्टोबर, बुधवार दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड दुपारी 3:30 वा  दुबई
9 ऑक्टोबर, बुधवार भारत विरुद्ध श्रीलंका संध्याकाळी 7:30 वा  दुबई
10 ऑक्टोबर, गुरुवार बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज संध्याकाळी 7:30 वा  शारजाह
11 ऑक्टोबर, शुक्रवार ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संध्याकाळी 7:30 वा  दुबई
12 ऑक्टोबर, शनिवार न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दुपारी 3:30 वा  शारजाह
12 ऑक्टोबर, शनिवार बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका संध्याकाळी 7:30 वा  दुबई
13 ऑक्टोबर, रविवार इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड दुपारी 3:30 वा  शारजाह
13 ऑक्टोबर, रविवार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संध्याकाळी 7:30 वा  शारजाह
14 ऑक्टोबर, सोमवार पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संध्याकाळी 7:30 वा  दुबई
15 ऑक्टोबर, मंगळवार इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संध्याकाळी 7:30 वा  दुबई
17 ऑक्टोबर, गुरुवार उपांत्य फेरी 1 संध्याकाळी 7:30 वा  दुबई
18 ऑक्टोबर, शुक्रवार उपांत्य फेरी 2 संध्याकाळी 7:30 वा  शारजाह
20 ऑक्टोबर, रविवार अंतिम संध्याकाळी 7:30 वा  दुबई

उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवला आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी असून संघ दोन गटात विभागले आहेत. अ गटात ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूजीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ आहेत. तर ब गटात बांग्लादेश, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड संघ आहेत.

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.