मेलबर्न: T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानला हरवलं. इंग्लंडची टीम दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनली आहे. याआधी इंग्लंडने 2010 साली टी 20 वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवलं होतं. इंग्लंडने फायनलमध्ये पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयात सॅम करन आणि बेन स्टोक्सने महत्त्वाची भूमिका बजावली. फायनलमध्ये सॅम करनने इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
फायनलचे दोन हिरो
सॅम करनने फायनलमध्ये 4 षटकात 12 धावा देऊन 3 विकेट काढल्या. दुसऱ्याबाजूला स्टोक्सने फायनलमध्ये नाबाद 52 धावांची खेळी केली. सॅम करनचा आयसीसीने निवडलेल्या टीम ऑफ द टुर्नामेंटमध्येही समावेश करण्यात आलाय.
रिकी पाँटिंग म्हणाला….
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने सुद्धा सॅम करनची ‘बॉलर ऑफ द टुर्नामेंट’ म्हणून निवड केलीय. आयसीसीने शेयर केलेल्या व्हिडिओने पाँटिंगने आपल्या पसंतीचा गोलंदाज निवडला. “माझ्यासाठी बॉलर ऑफ द टुर्नामेंट निवडणं सोप आहे. सॅम करन माझ्यासाठी बॉलर ऑफ द टुर्नामेंट आहे. त्याने मधल्या आणि लास्ट ओव्हर्समध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी केली, ते खरच कौतुकास्पद आहे” असं पाँटिंग म्हणाला.
सॅमने टी 20 वर्ल्ड कपमध्ये किती विकेट काढल्या?
सॅम करनने 6 मॅचमध्ये 13 विकेट घेतल्या. फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध त्याने जबरदस्त गोलंदाजीच प्रदर्शन केलं. 4 षटकात 12 धावा देऊन 3 विकेट काढल्या. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे.