IPL 2021 : भारतातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक, खेळाडू यावर सतत चर्चा करत असतात : पॉन्टिंग

दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने (Ricky Ponting) मान्य केलं आहे की, सध्या आयपीएलबाहेरील जग भयंकर आहे.

IPL 2021 : भारतातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक, खेळाडू यावर सतत चर्चा करत असतात : पॉन्टिंग
Ricky Ponting
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 5:37 PM

चेन्नई : गेल्या काही दिवसांत भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढल्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगवर (IPL 2021) त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भारताचा फिरकीपटू आणि दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख गोलंदाज आर.अश्विन याने सोमवारी आपण स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ रॉयर चॅलेंजर्स बंगळुरु संघातील अ‍ॅडम झॅम्पा आणि केन रिचडर्सन या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपण मायदेशी परतत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक आणि माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंगनेदेखील (Ricky Ponting) देशातील कोरोनाच्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. (Ricky Ponting says Covid-19 situation in India is worrisome, players are discussing on situation)

दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने (Ricky Ponting) मान्य केलं आहे की, सध्या आयपीएलबाहेरील जग भयंकर आहे. पॉन्टिंगने म्हटलं आहे की, खेळाडू बाहेरच्या परिस्थितीविषयी अनभिज्ञ नाहीत. खेळाडू सातत्याने बाहेरील परिस्थितीविषयी बोलत असतात. दिल्ली कॅपिटल्सच्या युट्यूब पेजवर पॉन्टिंग म्हणाला की, यावेळी आयपीएल स्पर्धा ही अतिशय वेगळ्या वातावरणात खेळवली जात आहे. मैदानापेक्षा जास्त, देशाबाहेर आणि देशात काय चाललं आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे. आम्ही सर्वजण सध्या बायो बबलमध्ये राहतोय, त्यामुळे आम्ही कदाचित देशातील सर्वात सुरक्षित लोकांपैकी आहोत, असं मला वाटतंय.

पॉन्टिंग म्हणाला की, “दररोज सकाळी नाश्त्याच्या वेळी टेबलावर खेळाडू बाहेरच्या परिस्थितीबद्दल बोलतात. मी सकाळी नाश्त्याच्या वेळी संघातील खेळाडूंशी बोलतो. त्यांचे कुटुंब कसे आहे, त्यांचे कुटुंब सुरक्षित आहे का, घरी सर्वजण खूश आहेत का, हे विचारत असतो. या परिस्थितीत खेळाडूंना आपल्या कुटूंबापासून दूर राहणे खूप अवघड आहे. मी त्यांच्या जागी स्वत: ला ठेवूनसुद्धा मी त्यांच्या स्थितीची कल्पना करू शकत नाही. अनेक खेळाडूंचे चेन्नईमध्ये घर आहे परंतु तेदेखील या परिस्थितीत कुटुंबाला भेटू शकत नाहीत. हे खूप कठीण आहे.”

डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ मायदेशी परतणार?

संपूर्ण भारत देश कोरोनाशी (India Covid 19) दोन हात करतोय. कोरोना रुग्णांमध्ये प्रत्येक दिवशी लक्षणीय वाढ होतेय. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होतीय. कुठे रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवतीय तर कुठे बेड मिळेनात… अशा सगळ्या भीतीच्या वातावरणात आयपीएलचं 14 वं पर्व (IPL 2021) सुरु आहे. अशावेळी कुणी आपल्या वैयक्तिक सुरक्षेच्या कारणास्तव तर कुणी कुटुंबीयांसाठी आयपीएल स्पर्धेला रामराम ठोकतंय. अगोदरच पाच खेळाडूंनी स्पर्धा अर्ध्यावरच सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अशातच यात आणखी दोन मोठ्या खेळाडूंची भर पडतीय. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि दिल्लीचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) मायदेशी परतण्यासंबंधीचं वृत्त आहे. 9 न्यूजच्या रिपोर्टनुसार हे दोघेही खेळाडू आयपीएलचं 14 वं पर्व अर्ध्यावरच सोडून मायदेशी परतणार आहे.

संबंधित बातम्या

IPL 2021 : ‘त्या’ शेवटच्या ओव्हरची विराटला धास्ती, दिल्लीविरोधात 8 बोलर्स वापरणार?, विराटचा प्लॅन काय?

IPL 2021 : कोलकात्याच्या डगआऊटमधून खेळाडूंना इशारे, कोडवर्ड्समधून सूचना, पाहा नेमका प्रकार काय?

IPL 2021 : के एल राहुलचा पुन्हा फ्लॉप शो, सोशल मीडियावर फॅन्स कडाडले, म्हणाले, ‘याला पाणी द्यायला ठेवा!’

(Ricky Ponting says Covid-19 situation in India is worrisome, players are discussing on situation)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.