रिकी पॉन्टिंगकडून Live शोमधून रोहित शर्माचा अपमान? जाणून घ्या काय झालं?
Ricky Ponting on Rohit Sharma : रिकी पॉन्टिंगने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा अपमान केल्याचा दावा केला जात आहे. जाणून घ्या नक्की खरं काय?
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कसोटीत त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहितने गेल्या काही महिन्यात मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 91 धावांची खेळी केली होती. या व्यतिरिक्त रोहितला तसं काही विशेष करता आलेलं नाही. तसेच रोहितला पितृत्वाच्या रजेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 1 डिसेंबरला प्राईम मिनिस्टर इलेव्हनविरुद्धच्या सामन्यातही फक्त 3 धावाच करता आल्या. आता टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 डिसेंबरपासून बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना एडलेड ओव्हल येथे होणार आहे. हा सामना डे-नाईट असून पिंक बॉलने खेळवण्यात येणार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याचं विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. रिकी पॉन्टिंगने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा लाईव्ह शो दरम्यान अपमान केल्याचा दावा केला जात आहे. पॉन्टिंगने खरंच रोहितचा अपमान केलाय का? जाणून घेऊयात.
पॉन्टिंगच्या व्हायरल प्रतिक्रियेत काय?
ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर इलेव्हन विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा अपयशी ठरला. रोहितवर यावरुन टीका करण्यात आली. रिकी पॉन्टिंगने या दरम्यान फॉक्स क्रिकेट या चॅनेलवरील लाईव्ह शोमधून भारतीय कर्णधाराचा अपमान करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे.
“रोहित सारख्या खेळाडूची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या शेफील्ड शील्ड स्पर्धेतील सामन्यांमधील प्लेइंग ईलेव्हनमध्ये जागा बनत नाही”,असं पॉन्टिंगने म्हटलं. पॉन्टिंगच्या प्रतिक्रियेनंतर भारतीय चाहते संतापले. मात्र रिकी पॉन्टिंग असं म्हणालाच नसल्याचं स्पष्ट झालं. तसेच हे सर्व फेक असल्याचं समोर आलं. पॉन्टिंगने रोहितबाबत असं काहीच म्हटलं नाही.
पॉन्टिंगची रोहितबाबतची ती प्रतिक्रिया फेक
Ricky Ponting (on Fox Sports) said, “Players like Rohit Sharma won’t even make it into the XI of Shield games in Australia”. pic.twitter.com/sCEqePvJJv
— Mufaddal Vohra (@muffadal_vohra) December 1, 2024
दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर, सीन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.