Rinku Singh ला बीसीसीआयकडून गोल्डन चान्स, इंग्लंड विरुद्ध संधी
Rinku Singh | टीम इंडियाला रिंकू सिंह याच्या रुपात ग्रेट असा फिनीशर मिळाला. रिंकूने आतापर्यंत केलेल्या कामगिरीच्या जोरावर निवड समितीने त्याला इंग्लंड विरुद्ध खेळण्याची संधी दिली आहे.
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. एकूण 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स याच्याकडे इंग्लंड क्रिकेट संघाची धुरा आहे. या मालिकेआधी हॅरी ब्रूक याने मालिकेतून वैयक्तिक कारणाने माघार घेतली आहे. तर ब्रूकच्या जागी डेन लॉरेन्स याचा समावेश करण्यात आला आहे. तर टीम इंडियाच्या विराट कोहली यानेही पहिल्या 2 सामन्यातून वैयक्तिक कारणाचा दाखल देत माघार घेतली आहे.
कसोटी मालिकेला अवघ्या 48 तासांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. त्याआधी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. आता टीम इंडियाचा फिनीशर रिंकू सिंह व्हाईट जर्सीत खेळताना दिसणार आहे. रिंकूने टी 20 आणि त्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानंतर आता बीसीसीआयने रिंकूला रिटर्न गिफ्ट दिलं आहे.
रिंकूची इंग्लंड लायन्स विरुद्धच्या 4 दिवसीय दुसऱ्या सामन्यासाठी इंडिया एमध्ये निवड करण्यात आली आहे. हा 4 दिवसीय दुसरा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. अभिमन्यू इश्वरन हा इंडिया ए चं नेतृत्व करणार आहे. तर जोश बोहानोन याच्याकडे इंग्लंड लायन्सची सूत्र आहेत.
हा सामना 24 ते 28 जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. दरम्यान टीम इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात पहिला 4 दिवसीय अनऑफिशियल सामना हा 17 ते 20 जानेवारी दरम्यान पार पडला. हा सामना ड्रॉ झाला होता. आता दुसऱ्या समन्यात दोन्ही संघांचा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.
रिंकू सिंह याचा टीम इंडिया एमध्ये समावेश
🚨 NEWS 🚨
Rinku Singh added to India ‘A’ squad for 2nd four-day match against England Lions.
Details 🔽https://t.co/rzPpDxD0OB
— BCCI (@BCCI) January 23, 2024
टीम इंडिया ए | अभिमन्यू इश्वरन (कॅप्टन), साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, सरफराज खान (विकेटकीपर), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, विद्वत कवेरप्पा, तुषार देशपांडे, यश दयाल, सौरभ कुमार, आकाश दीप, उपेंद्र यादव आणि कुमार कुशाग्र.
इंग्लंड लायन्स | जोश बोहॅनन (कर्णधार), कीटन जेनिंग्स, अॅलेक्स लीस, जेम्स र्यू, डॅन मौसले, ऑलिव्हर रॉबिन्सन (विकेटकीपर), ब्रायडन कार्स, मॅथ्यू पॉट्स, मॅथ्यू फिशर, जॅक कार्सन, कॅलम पार्किन्सन, कॅसे अल्ड्रिज, जेम्स कोल्स, ऑलिव्हर प्राईज आणि टॉम लॉज.