Rinku Singh | रिंकू सिंहला खेळण्याची संधी तरीही वाटतंय भीती, काय म्हणाला ते बघा Watch Video
आयपीएल 2023 स्पर्धेत रिंकू सिंहने सलग पाच षटकार मारत नावलौकिक मिळवला होता. त्यानंतर त्याची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. आयर्लंड विरुद्ध खेळण्यापूर्वी रिंकू सिंहला एक भीती सतावत आहे.
मुंबई : भारत आणि आयर्लंड यांच्या तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु होण्यासाठी काही तासांचा अवधी शिल्लक आहे. 18 ऑगस्टला आयर्लंडविरुद्ध पहिला टी20 सामना होणार आहे. जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात आयर्लंडला गेलेल्या भारतीय संघात रिंकू सिंह यांची निवड झाली आहे. आयपीएलमध्ये गुजरातच्या तोंडातील घास रिंकू सिंहने सलग पाच षटकार मारत हिरावून घेतला होता. त्यामुळे रिंकू सिंह याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. पण या सामन्याच्या 24 तासाआधी रिंकू सिंह याने आपल्यावरील टेन्शनचा खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना असंच काहीसं हरभजन सिंह आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या बाबतीत झालं होतं.
काय म्हणाला रिंकू सिंह?
उत्तर प्रदेशच्या 25 वर्षीय रिंकू सिंह याने टीम इंडियाची निळी जर्सी परिधान करून आपलं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. पहिल्या टी20 सामन्यात डेब्यू करेल अशी आशाही क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यापूर्वी खेळाडूंना टेन्शन येतं. पण रिंकू सिंह याची वेगळीच डोकेदुखी आहे. त्याने याबाबतचा खुलासा बीसीसीआयने पोस्ट केलेल्या मुलाखतीत केला आहे.
From emotions of an India call-up to the first flight ✈️ & Training session with #TeamIndia 😃
𝗪𝗵𝗲𝗻 𝗱𝗿𝗲𝗮𝗺𝘀 𝘁𝗮𝗸𝗲 𝗳𝗹𝗶𝗴𝗵𝘁 ft. @rinkusingh235 & @jiteshsharma_ 👌👌 – By @RajalArora
Full Interview 🎥🔽 #IREvINDhttps://t.co/m4VsRCAwLk pic.twitter.com/ukLnAOFBWO
— BCCI (@BCCI) August 17, 2023
बीसीसीआयच्या वेबसाईटवर टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मासह झालेल्या चर्चेत रिंकू सिंह याने सांगितलं की, “इंग्रजी बोलताना अडचण येत आहे. क्रिकेटपेक्षा मुलाखतीचं टेन्शन येतं.” इतकंच काय तर पहिल्यांदा हॉटेल रुममध्ये गेलो तेव्हा टीम इंडियाची जर्सी पाहून भावूक झाल्याचंही त्याने सांगितलं.
रिंकू सिंह याच्या जर्सीवर 35 नंबर आणि नाव लिहिलं आहे. जर्सी पाहिल्यानंतर स्वप्न सत्यात उरल्याचा भास झाला. रिंकू सिंह याला संघात निवड झाल्याची माहिती नोएडामध्ये मित्रांसोबत प्रॅक्टिस करत असताना मिळाली. यानंतर त्याने आईला फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली.
दोन्ही संघांचे खेळाडू
टीम इंडिया : जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर, शिवम दुबे, शाहबाज अहमद, संजू सॅमसन, जितेश शर्मा, रवि बिश्णोई, प्रसिद कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, अवेश खान